नाशिक

सातपुड्यातील अस्तंबा ऋषी यात्रेला भाविकांचा महापूर

CD
मेन करणे --- NSK26H34830/ NSK26H34831 धडगाव : अस्तंबा ऋषींच्या दर्शनासाठी भाविकांची झालेली गर्दी. --- अस्तंबा ऋषी यात्रेला भाविकांचा महापूर यात्रेच्या इतिहासात ‘रेकॉर्डब्रेक’ गर्दी, दर्शनासाठी लांबच लांब रांगा सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ९ : सातपुडा पर्वतरांगेत तब्बल साडेचार हजार फूट उंचीवर वसलेल्या श्री अस्तंबा ऋषींच्या यात्रेला यंदा भाविकांचा अलोट जनसागर लोटला आहे. गेल्या चार दिवसांत लाखो भाविकांनी अस्तंबा ऋषींचे दर्शन घेतले आहे. वाढत्या गर्दीमुळे भाविकांना दर्शनासाठी तासनतास रांगेत उभे रहावे लागत आहे. यंदा यात्रेने गर्दीचा विक्रम मोडला असून, यामुळे संपूर्ण सातपुड्याचा परिसर भक्तिमय झाला आहे. दिवाळीला धनत्रयोदशीपासून अस्तंबा ऋषींच्या यात्रेला प्रारंभ झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांसह खानदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशातून लाखो भाविक हजेरी लावतात. अस्तंबा ऋषींचे साडेचार हजार फूट उंचीवर असलेले हे शिखर सर करणे अत्यंत कठीण असून, शारीरिक कसोटी पाहणारे आहे. मात्र, श्रद्धाळू भक्तगण अडचणींवर मात करत हे शिखर गाठत असतात. यंदा यात्रेला भाविकांचा महापूर पहायला मिळत आहे. मुख्य गाभाऱ्यात दर्शन घेण्यासाठी शिखरावरच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यात्रेच्या पहिल्या दोनच दिवसांत लाखोच्या संख्येेने भाविकांनी दर्शन घेतले आहे. यात्रेच्या आजवरच्या इतिहासातील ही सर्वाधिक गर्दी असून, यामुळे सातपुडा पर्वतरांगांमध्ये चैतन्यमय आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. --- स्वतंत्र बॉक्स करणे NSK26H34832 धडगाव : दर्शन घेऊन परतलेल्या भाविकांची काढण्यात आलेली मिरवणूक. --- दर्शन घेऊन परतलेल्या भाविकांची मिरवणूक अस्तंबा ऋषींच्या यात्रोत्सवाला हजारो वर्षांची परंपरा आहे. याठिकाणी दर्शन घेऊन आदिवासी बांधव जल-जंगल आणि जमिनीच्या रक्षणासाठी साकडे घालतात. दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांचा आनंद द्विगुणित झालेला असतो. या यात्रेनिमित्त धडगाव शहरातून आदिवासी भाविकांनी पारंपरिक मिरवणूक काढली. मिरवणुकीत आदिवासी संस्कृतीचे अनोखे दर्शन घडले. या वेळी काही भाविकांनी वेगवेगळ्या वेशभूषा करून लक्ष वेधून घेतले. डोक्यावर धान्याचा पवित्र कळस घेऊन आदिवासीबांधव मार्गस्थ होत होते. या यात्रेचे केवळ धार्मिकच नव्हे, तर निसर्ग संवर्धनातही महत्त्व आहे. निसर्गदेवतेचे आणि मानवाचे अतूट नाते दर्शविणारी ही यात्रा आदिवासी बांधवांच्या प्रगाढ श्रद्धेचे आणि निसर्गप्रेमाचे मूर्तिमंत प्रतीक ठरली आहे. --- चौकट सोलर अन् हायमास्टचे लोकार्पण धडगाव तालुक्यात असलेल्या मौजे अस्तंबा येथे विविध विकासकामांचे लोकार्पण आमदार आमश्या पाडवी यांच्याहस्ते झाले. येथील नकट्यादेव रस्त्यावर आणि यात्रास्थळी दोन मोठे हायमास्ट उभारण्यात आले असून, ५२ सोलर स्ट्रीट लाइट्स लावण्यात आले आहेत. यामुळे संपूर्ण नकट्यादेव रस्ता आणि अस्तंबा परिसर आता रात्रीच्या वेळीही उजळून निघणार आहे. या वेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजयसिंह पराडके, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके, माजी समाजकल्याण सभापती शंकर पाडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पराडके, तालुकाप्रमुख संदीप वळवी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कान्हा नाईक, प्रवीण पावरा, पुरुषोत्तम पावरा, चेतन पावरा, तालुका संघटक धिरसिंग पाडवी, सरपंच दिनेश वसावे, चेतन नाईक, अस्तंबा ट्रस्टचे धिरसिंग वळवी, तुंबड्या पाडवी आणि पुजारी महाराज उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतातील एका वर्षाच्या आठवणींनी परदेशी पर्यटक भावुक; 'या देशाने जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला'

India Women Squad : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताच्या वनडे, टी२० अन् कसोटी संघांची घोषणा! स्मृती मानधना असणार कर्णधार

Maharashtra Live News: मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याविषयीच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध; मेढ्यात भाजप कार्यकर्ते व नागरिकांचा भव्य मोर्चा, कठोर कारवाईचा इशारा

Kolhapur Talent: एका इन्स्टा व्हिडीओने उघडले नशिबाचे दार; कोल्हापुरातून थेट अमेरिकेच्या बॉय बँडमध्ये एन्ट्री! जाणून घ्या दर्शन मगदूमचा भन्नाट प्रवास

Gokul Dairy Chairman Election High Court Ruling : 'गोकुळ'च्या अध्यक्ष निवडीत सर्वात मोठा ट्विस्ट; मतदानापूर्वी कोर्टाचा निकाल, बदलले सत्तेचे गणित!

SCROLL FOR NEXT