crime news
crime news esakal
नाशिक

Nashik Crime News : मालेगावातील जाफरनगरात दोघांवर हल्ला; दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील जाफरनगर भागात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून कुरापत काढून तरुणासह दोघांवर सात सराईत गुन्हेगारांनी हल्ला केला. हल्ल्यात सर्रासपणे तलवार, कोयते, शॉकअप, लाकडी दांडक्याचा वापर करण्यात आला. हाणामारीत एकजण जखमी झाला. फातमा मशिदीजवळ रविवारी पहाटे हा प्रकार घडला. पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे. अन्य संशयितांचा शोध सुरु आहे. (Attack on two in Jafarnagar in Malegaon Both arrested Nashik Crime News)

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

जाफरनगर भागातील युसूफ अहमद अली (रा. फातमा मशिदीजवळ) याच्यासह त्याचा मित्र अलताफ फय्याज अहमद यांना तू नविद टकाऱ्या व बिलाल यांच्या सोबत राहत असल्याची कुरापत काढून मुशीर चोरवा, जावेद हनुमान, जावेद शेख रफिक ऊर्फ साजिद डुग्गी (वय २७, तिघे रा. जाफरनगर), सिरीया (रा. गोल्डननगर), समीरलाला समीरन्नी (रा. आहिल्या हादीस मशिदीजवळ), हारुन येडा (रा. गुलाब पार्क), दानीश लंबेबालवाला (पूर्ण नाव माहीत नाही) यांनी तलवार, कोयते, लाकडी दांडा व शॉकअपने हाता, पायाला व डोक्याला जबर मारहाण करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

संशयित हल्लेखोर हबीब हॉटेल येथे खुर्च्यांची तोडफोड करत फरार झाले. युसूफच्या तक्रारीवरून पवारवाडी पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जावेद शेख, समीर लाला या दोघांना अटक केली आहे. उपनिरीक्षक एन. आर. शेख तपास करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT