pavbhaji gadi.jpg
pavbhaji gadi.jpg 
नाशिक

पावभाजी विक्रेत्यावर खंडणीखोराचा हल्ला; पैसे मागितल्यावर ठार करण्याची धमकी 

हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : नाशिक रोडला सध्या गुन्हेगारीने उच्चांक मोडले आहेत. सध्या राजरोसपणे खंडणी मागत असल्याचे प्रकार घडत असून, मुक्तिधामजवळ पावभाजी विक्रेत्याला खंडणीची मागणी करून गुंडाने शस्त्राने वार केले. यात पावभाजी विक्रेता जखमी झाला. उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पैसे मागितल्यावर ठार करण्याची धमकी

मंगेश कदम (रा. साईमित अपार्टमेंट, आनंदनगर, नाशिक रोड) यांच्या तक्रारीनुसार, कदम यांचे मुक्तिधामशेजारील सोमाणी उद्यान संरक्षक भिंतीला खेटून पावभाजीचे दुकान आहे. तेथे खंडणीखोर सत्तू भैरू राजपूत नियमित खाऊन-पिऊन जात होता. मात्र पैसे देत नव्हता. पैसे मागितल्यावर ठार करण्याची धमकी देत असे. गुरुवारी (ता.२९) रात्री आठच्या सुमारास सत्तू राजपूत पुन्हा कदम यांच्या दुकानात आला. पैशांचा हप्ता मागू लागला. कदम याने पैसे देण्यास नकार दिल्यावर धारधार हत्यार दाखवून ठार करण्याची धमकी दिली.

खंडणीखोरांचा कायमस्वरूपी बिमोड करावा

कदम याने विरोध केला असता सत्तूने हत्याराने डाव्या हाताच्या बोटावर वार करून जखमी केले. खाद्यपदार्थ विक्रेत्यांना खंडणीखोर त्रास देत असून, खंडणीखोरांचा कायमस्वरूपी बिमोड करावा, अशी मागणी विक्रेत्यांनी केली आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT