Trimbakeshwar Temple esakal
नाशिक

Nashik: जमावाकडून त्र्यंबकेश्र्वर मंदिरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न, नेमका प्रकार काय? सविस्तर जाणून घ्या

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिराच्या घटनेत हिंदू धर्मियांशिवाय इतरांना प्रवेश दिला जात नाही असे नियम आहेत. मात्र तरीही 13 मे रोजी रात्री 9 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास काही व्यक्तींनी उत्तर (महाद्वार) दरवाजाने जबरदस्ती आत जाण्याचा प्रयत्न केला. (Attempt to forcefully enter Trimbakeshwar temple by mob hindu muslim community nashik latest news)

या घडलेल्या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली. यामुळे सामाजिक सलोखा बिघडू नये, सामाजिक तेढ निर्माण होऊ नये याकरिता देवस्थान ट्रस्ट प्रशासनाने त्र्यंबक पोलीस ठाण्यात घडल्या प्रकारा बाबतपत्र दिले आहे.

सदर घटनेचा तपास करून संबंधीतांवर याग्य ती कारवाई करण्याची मागणी देखील मंदिर ट्रस्ट सह ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

दरम्यान अशाच प्रकारे पुरोहित संघ, ब्राम्हण महासंघ, मराठा महासंघ यासह सुमारे 15 हिंदुधर्मिय संघटनांनी निवेदन तक्रार अर्ज दिले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यावेळी 10 ते 12 युवकानी मंदिरात शिरण्याचा प्रयत्न केला. तेथे बंदोबस्तास असलेले एमएसएफ जवानांनी त्यांना रोखले. आपणास आत जाता येणार नाही असे सांगीतले. त्यानंतर जवळपास 15 मिनेट त्यांच्या हुज्जत झाली. मात्र अखेर प्रवेश न घेता ते तेथून पुढे निघुन गेले.

आज याबाबत त्रंबकेश्वर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे, सहायक पोलिस निरीक्षक जगताप, गवळी यांच्या उपस्थितीत शांतता समितीच्या सदस्यांची बैठक घेऊन शहराची शांतता अबाधित राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे व मंदिरात प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करणार्या लोकांना सक्त ताकीद देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT