suicide  esakal
नाशिक

नाशिक : लासलगाव पोलिस ठाण्यात युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

विनोद बेदरकर

नाशिक : लासलगाव पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. ५) सकाळी एका युवकाने विष घेउन आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रेमविवाहाच्या कारणातून त्याला पोलिस ठाण्यात बोलाविण्यात आल्यानंतर मारहाण झाली, असा त्याच्या वडीलांचा आरोप आहे.

पोलिस ठाण्याच्या आवारातच विष घेण्याचा प्रयत्न

हा प्रकार लासलगाव पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्याकडून आधी लासलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात व त्यानंतर नाशिकला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आले. शुभम विठ्ठल गाडे (रा. भिंगाटे, ता. येवला) असे या तरूणाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी त्याने राज्यात एका धार्मिक स्थळी प्रेमविवाह केला आहे. त्याविषयी तक्रार झाल्याने त्याला लासलगाव पोलिसांनी त्याला शनिवारी चौकशीसाठी बोलावले होते. त्यावेळी ही घटना घडली. दरम्यान, याबाबत शुभमच्या वडीलांनी केलेल्या आरोपांनुसार वादाच्या निमित्ताने पोलिसांनी बोलावले म्हणून तो सकाळी पोलिस ठाण्यात गेला होता. तेथे त्याला मारहाण झाली. मारहाण कुणी केली हे काही स्पष्ट झालेले नव्हते. मात्र, या अपमानातूनच त्याने पोलिस ठाण्याच्या आवारात विष घेउन आत्महत्येचा प्रयत्न केला. स्थानिक पोलिसांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्याला आधी लासलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात व त्यानंतर नाशिकला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा आरोपही त्याच्या वडिलांनी केला आहे. त्यानुसार जिल्हा रुग्णालयात नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT