Former MLA Rajabhau Waje while starting the auction of milch animals in the sub market of Sinnar Bazaar Committee. esakal
नाशिक

Milch Animals Auction: वडांगळी येथे दुभत्या जनावरांचा लिलाव : आमदार वाजे

खरेदी-विक्रीची सुविधा झाल्याने समितीस सहकार्य करा

सकाळ वृत्तसेवा

Milch Animals Auction : स्थानिक सिन्नर बाजार समितीच्या उपबाजारांचा विकास होण्यासाठी प्रत्येक बाजार समितीच्या उपबाजाराच्या ठिकाणी उपसमिती नेमण्यात यावी. त्यामार्फत विकास योजना राबविण्यासाठी प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी केले. (Auction of milch animals at Wadangali MLA Waje nashik)

येथील वडांगळी सिन्नर बाजार समितीच्या उपबाजारात दुभत्या जनावरांचा लिलाव प्रारंभ करताना ते बोलत होते. माजी आमदार राजाभाऊ वाजे व युवा नेते उदय सांगळे यांचे हस्ते श्रीफळ वाढवून प्रारंभ करण्यात आला.

श्री. वाजे यांनी सांगितले, की शेतकरीबांधवांनी दुधाळ जनावरे, गायींची जवळच खरेदी-विक्रीची सुविधा झाल्याने बाजार समितीस सहकार्य करावे.

उदय सांगळे यांनी सांगितले, की समितीचे संचालक मंडळ कार्यान्वित होऊन केवळ ४७ दिवस झालेले आहेत. बाजार समितीचे सभापती डॉ. रवींद्र पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

संचालक मंडळाने या ४७ दिवसांत सिन्नर मुख्य बाजार आवारातील सर्व घटकांसाठी शुद्ध व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणेसाठी योग्य ते प्रयत्न केलेले आहेत.

ज्या कांदाविक्रेत्या शेतकऱ्यांची कांदा विक्रीची रक्कम थकीत येणे आहे ती शेतकऱ्यांना मिळून देणेसाठी बाजार समितीचे संचालक मंडळ प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या वेळी बाजार समितीचे सभापती रवींद्र पवार, उपसभापती सिंधूबाई केशव कोकाटे, संचालक नवनाथ घुगे, सुनील चकोर, रवींद्र शेळके, शरदराव थोरात, जालिंदर थोरात, श्रीकृष्ण घुमरे, गणेश घोलप, प्रकाश तुपे, नवनाथ नेहे, भारत कोकाटे, दीपक खुळे, रामदास खुळे, गणेश चव्हाणके, गणेश कोकाटे उपस्थित होते.

वडांगळी बाजार आवारात एचएफ, होस्टेन, कालवडी, बैल, म्हैस, गोऱ्हे या जनावरांची आवक होत आहे. जातिवंत व दुधाळ खात्रीशीर गायी बाजार आवारात खरेदी-विक्रीसाठी येत आहे. पशुपालकांची व दूध उत्पादक शेतकरी बांधवांची जनावरे खरेदी-विक्रीची गैरसोय दूर व्हावी, या उद्देशाने कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नरने जनावरे बाजार भरविण्यात आलेला आहे.

शेतकरी व व्यापारी बांधवांनी आपले जनावरे खरेदी-विक्रीकरिता वडांगळी उपबाजार आवारात प्रत्येक शुक्रवारी आणावीत, असे आवाहन सभापती डॉ. रवींद्र पवार, उपसभापती सिंधूताई कोकाटे, सचिव विजय विखे व सर्व संचालक मंडळाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT