‘प्रेक्षक शरण’ हीच यशस्वी रंगकर्मीची ओळख!
प्रशांत दामले : ‘लेखक तुमच्या भेटीला’ कार्यक्रमात अनुभव कथन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १० : नाटक पाहण्यासाठी प्रेक्षक पैसे खर्च करून सभागृहात येतो. त्याच्या पैशांचे मोल जपत मनोरंजन करणे आणि त्याच्या आवडीची नाटके सादर करणे, हे कलाकाराचे पहिले कर्तव्य आहे. प्रेक्षकांशी नाळ जोडतानाच पडद्यामागील कलाकार आणि तंत्रज्ञांनाही जपले पाहिजे. हीच ‘प्रेक्षक शरण’ भूमिका यशस्वी रंगकर्मीची ओळख असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नाट्य-सिनेअभिनेते आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबईचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केले.
‘लेखक तुमच्या भेटीला’ या कार्यक्रमात डॉ. स्मिता मालपुरे यांनी दामले यांच्याशी संवाद साधला. या वेळी त्यांनी गायनापासून अभिनय आणि नाट्यनिर्मितीपर्यंतच्या प्रवासातील अनुभव सांगितले.
आठवीत असताना गायलेल्या गाण्यापासून कलाप्रवासाला सुरुवात झाली. १९८३ मध्ये ‘टूर टूर’ या नाटकातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. गाणी ऐकण्याच्या छंदातून संगीताची समज विकसित झाली, तर अभिनयातील चुका आणि अनुभवांतून निर्मिती क्षेत्राकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाली, असे दामले यांनी सांगितले.
प्रेक्षकांचे लक्ष खिळवून ठेवणे हे आव्हान असल्याचे नमूद करताना त्यांनी कलाकाराने स्वतः कामाचा आनंद घेत प्रेक्षकांच्या अपेक्षांचाही विचार करावा, असे सांगितले. नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा असून, २००८ मध्ये ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू करणारा पहिला निर्माता आपण असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला नाट्य-सिनेअभिनेते व माजी प्रशासकीय अधिकारी अशोक देवरे आणि आदिवासी आयुक्त लीना बनसोड उपस्थित होते. प्रारंभी पक्षीमित्र दिगंबर गाडगीळ आणि सिनेअभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दिग्दर्शक सचिन शिंदे, नयना शिंदे, संजय देवधर, श्रीपाद देशपांडे आणि श्रद्धा देशपांडे यांचा दामले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.