auto rickshaw driver daughter Sneha Ghatmale became RTO officer nashik
auto rickshaw driver daughter Sneha Ghatmale became RTO officer nashik sakal
नाशिक

रिक्षाचालकाची मुलगी बनली आरटीओ अधिकारी

- युनूस शेख

जुने नाशिक : मनाचा ठाम निश्चय जिद्द आणि चिकाटी ठेवली तर कुठलीही गोष्ट शक्य होऊ शकते. अमरधाम रोड येथील सामान्य कुटुंबात जन्मलेल्या स्नेहा चंद्रकांत घटमाळे तरुणीने सिद्ध करून दाखवून दिले. एका रिक्षाचालकाची मुलगी ते आरटीओ अधिकारी अशी मजल मारून कुटुंबीयांचेच नव्हे तर जुने नाशिककरांचे नावदेखील उंचावले.शासकीय अधिकारी व्हायचे, असे ध्येय मनाशी बाळगून स्नेहा घटमाळे हिने तिच्या आयुष्याची सुरवात केली. त्याअनुषंगाने तिने सारडा कन्या शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण घेऊन पुढील शिक्षण के. के. वाघ महाविद्यालयात घेत २०२० मध्ये अभियांत्रिकी आणि डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले.

२०२० ते २०२१ असे एक वर्ष तिने एका कंपनीत नोकरी केली. दरम्यान, १५ मार्च २०२० ला तिने आरटीओ अधिकाऱ्याची पूर्व परीक्षा दिली. एका वर्षात नोकरी सोडून मुख्य परीक्षेसाठी तिने सराव सुरू केला. २० नोव्हेंबर २०२१ ला सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाची मुख्य परीक्षा दिली. मंगळवारी (ता. २२) मुख्य परीक्षेचा निकाल घोषित झाला. त्यात स्नेहा एनटीबी महिला आरक्षण वर्गात पहिल्याच प्रयत्नात राज्यात द्वितीय क्रमांक पटकावीत सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक होण्याचा मान मिळविला. मुख्य परीक्षेसाठी एकूण ५ हजार विद्यार्थी बसले होते. त्यात ६८९ क्रमांकाने उत्तीर्ण झाली. २४० रिक्त जागांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. त्यात आरक्षणानुसार स्नेहा त्या पदावर येत्या काही महिन्यात नियुक्त होणार असल्याची खात्री तिने व्यक्त केली. आई- वडील, भाऊ, बहीण यांचा माझ्या यशामध्ये मोठा वाटा राहिला असल्याची प्रतिक्रिया तिने दिली.

आईचे स्वप्न केले साकार

अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना आवश्यक असलेले पुस्तक खरेदी करण्यासाठी आईसह बाजारात गेली असता, पुस्तकाच्या दुकानात आरटीओ अधिकारी परीक्षेसाठी आवश्यक असलेले पुस्तक आईच्या नजरेस पडले. त्यावरील वर्दीतील छायाचित्र आईला आकर्षित करून गेले. आईने स्नेहाकडे अशाच प्रकारे अधिकारी होण्याची इच्छा व्यक्त केली. तिने जिद्द पकडत सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या परीक्षेत यश प्राप्त करून आईचे स्वप्न साकार केले.

यापुढे लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन प्रादेशिक परिवहन विभागाच्या यापेक्षाही मोठ्या वरिष्ठ अधिकारीपदी नियुक्त होण्याचा प्रयत्न करीत राहील. अन्य मुलींनीदेखील शिक्षणात पुढे यावे, उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे.

- स्नेहा घटमाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! पोलिसांचं धाबं दणाणलं

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

SCROLL FOR NEXT