नाशिक

अहिंसा फार्मसीत अविष्कार स्पर्धा

CD
NGL26B04089 दोंडाईचा : येथील अहिंसा फार्मसी कॉलेजमध्ये ‘अविष्कार’ स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांसमवेत प्राध्यापक. ------------ दोंडाईचा अहिंसा फार्मसीमध्ये ‘अविष्कार’ स्पर्धा उत्साहात निमगूळ, ता. ६ : दोंडाईचा येथील अहिंसा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेजला ‘अविष्कार स्पर्धा २०२६’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला, नाविन्यपूर्ण कल्पनांना व वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले. वैद्यकीय व औषधनिर्माणशास्त्र, शुद्ध विज्ञान, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, कृषी व पशुसंवर्धन स्पर्धेत विविध क्षेत्रांचा समावेश करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधन प्रकल्पांचे प्रभावी सादरीकरण केले. स्पर्धेतील विजेत्यांची क्षेत्रनिहाय निवड करण्यात आली. त्यात वैद्यकीय व औषधनिर्माणशास्त्र स्पर्धेत प्रथम किरण पाटील, अदिती पाटील, द्वितीय प्रेरणा सोनवणे, तेजस्विनी पाटील, मोनाली धनगर यांनी यश मिळवले. विज्ञान स्पर्धेत प्रथम चेतना गिरासे, वृषाली धनगर, वैशाली देसले, द्वितीय अंजली बोरसे, निता धनगर, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान स्पर्धेत प्रथम प्रतिक्षा मोरे, स्वाती मोरे, द्वितीय साक्षी पाटील, रुचिता पाटील, कृषी व पशुसंवर्धन स्पर्धेत प्रथम धनश्री गुरव, भाविका गिरासे, द्वितीय पायल परदेशी, रोणक पाटील यांनी यश संपादन केले. प्रा. डॉ. पल्लवी पिंपळकर, डॉ. शरद सूर्यवंशी यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. फार्मसीचे प्राचार्य डॉ. डी. ए. पाटील, उपप्राचार्य डॉ. पी. ए. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अविष्कार स्पर्धा २०२६ पार पडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA Hike: आठव्या वेतन आयोगात पुन्हा DA वाढणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर काय होणार परिणाम?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांविरोधात याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा इशारा |

अजय देवगनला भेटलो नाही, पण... 'दृश्यम ३' पाहून पहिल्या भागातच मेलेला सॅम म्हणतो- मी सिनेमात जिवंत असतो तर...

IPL 2027 Cricket News: दिल्ली कॅपिटल्सने नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली! 'दादा' कर्णधाराच्या Video ने प्रतिस्पर्ध्यांची झोप उडवली

Marathi News Live Updates: काढणीआधीच चार एकर ऊस जळून खाक; विद्युत तारांमधून ठिणगी पडल्याने शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

SCROLL FOR NEXT