A dark green layer on the water stored in the storage dam at Khedlejunge. esakal
नाशिक

Nashik: गोदेतील पाण्याचा पिण्यासाठी वापर करू नका; पाटबंधारेच्या सोमठाणे शाखेतर्फे ग्रामपंचायतींना नोटीसा

सकाळ वृत्तसेवा

दत्तात्रेय खुळे : सकाळ वृत्तसेवा

Nashik : खेडलेझुंगे (ता.निफाड) येथील गोदावरी पात्रात पाण्यात रासायनिक द्रव्य टाकल्याच्या घटनेनंतर नाशिकच्या पाटबंधारे विभागाच्या सोमठाणे शाखेने स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने व ग्रामस्थांनी पात्रातील पाण्याचा वापर पिण्यासाठी अन् जनावरांसाठी करू नये असा सूचना केल्या आहेत.

ग्रामपंचायतींना लेखी नोटीस बजावण्यात आल्या आहेत. घटनेच्या पाचव्या दिवशी आज गोदावरी पात्रातील पाण्याला असलेला केमिकलचा दर्प थांबला आहे. परंतु पाण्यावरील हिरवा रंगाचा थर कमी झालेला नाही. (avoid use godavari water for drinking Notice to Gram Panchayats by Somthane Branch of Irrigation Nashik news)

खेडलेझुंगेच्या साठवण बंधारा ते पुलापर्यंत हा थर अधिक साचलेला आहे. नाशिक पाटबंधारे विभागाच्या सोमठाणे शाखेच्या अधिकारींनी कालवा आवर्तन सुरू असताना केमिकलयुक्त रासायनिक द्रव्ये प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.

शाखा अभियंता ओमकार भंडारी यांच्या सहीच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. कालवा निरीक्षक प्रवीण सुरासे यांनी खेडलेझुंगे व कोळगाव ग्रामपंचायत प्रशासनाला बजावल्या आहे.

नाशिकचे प्रदूषण नियंत्रण शाखेचे क्षेत्रीय अधिकारी मोहरकर यांनी दुसऱ्यांदा घेतलेल्या पाण्याच्या नमुन्याचा अहवाल येईपर्यंत येथील पाणी पिऊ नये असे नोटीशीत म्हटले आहे. प्रदूषण नियंत्रण शाखेने आज सहा पानी अहवाल सादर केला, तो दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या प्रकाराबाबत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

गोदावरी पात्रात खेडलेझुंगेच्या बंधाऱ्याखालील भागात आज पाचव्या दिवशी पाहणी केली असता येणाऱ्या पाण्याचा वास पूर्णता गेला आहे. त्यामुळे अंजनापूर (ता. कोपरगाव) येथील निफाडला जाणाऱ्या दिंडीतील वारकरी गोदावरी पात्रात स्नान करत होते.

परिसरातील महिला गोदावरी तीर्थ घेऊ नका असे सांगत होते. घटनास्थळ पुलापासून ते साठवण बंधारा संपूर्ण नदीपात्रात आज केमिकल मिश्रित गोण्या आढळून आल्या नाही, पण बंधारा ते पुलापर्यंत भाग अधिक हिरवट दिसला आहे.

"दोन दिवस गोदावरी पात्रात धुणे धुतले. त्यानंतर कपड्यांचा वास गेला नाही. घरी जाऊन पुन्हा धुवावे लागले आहेत. गोदापात्रात अशी घाण टाकणाऱ्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे."

- लीलाबाई वाघ, ज्येष्ठ महिला, खेडलेझुंगे.

"आम्ही महिला पुलाखाली धुणे धुतो. पाच दिवसांपासून साठवण बंधाऱ्याजवळील खडकांवर आपटून वासामुळे धुणे धूत आहे. आज तो वास गेला आहे."

- चित्रा वाघ, युवा गृहिणी, खेडलेझुंगे.

"सोमठाणे पाटबंधारे विभागाच्या सिंचन शाखेने ग्रामपंचायतींना प्रदूषण नियंत्रण शाखेचा नवा अहवाल येईपर्यंत पाणी वापरू नये अशा नोटिसा बजावल्या आहेत. नव्याने पाणी नमुने तपासणी अहवाल लवकरच येईल."

- ओमकार भंडारी शाखा अभियंता सोमठाणे गोदावरी सिंचन विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटनास बंदी

SCROLL FOR NEXT