Kidney Diseases esakal
नाशिक

Kidney Disease: सावधगिरीतून टाळा मूत्रपिंडाच्‍या व्‍याधी; उन्हाच्या तडाख्यात द्रवपदार्थांचे सेवन ठरते हितकारी!

अरुण मलाणी

Kidney Disease : उन्हाचा तडाखा आता जाणवू लागला आहे. पारा चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोचलेले असताना, आरोग्‍याचे प्रश्‍न उद्‍भवू लागले आहेत. त्यातच हलगर्जी व दुर्लक्षामुळे मूत्रपिंडाचे (किडनी) सौम्‍य ते गंभीर स्‍वरूपाच्या ‍व्‍याधी होऊ शकतात.

पाणी व अन्‍य द्रवपदार्थांचे भरपूर सेवन करताना व सावधगिरीतून मूत्रपिंडाच्‍या व्‍याधी दूर ठेवण्याचा सल्‍ला तज्‍ज्ञांकडून दिला जात आहे. (Avoid with caution Kidney disease Consuming fluids in hot summer beneficial nashik news)

उन्‍हाळ्यात विविध कामांनिमित्त घराबाहेर पडताना अनेकवेळा मुबलक पाणी पिले जात नाही. या किरकोळ दुर्लक्षामुळे गंभीर स्वरू‍पाचे आजार होण्याची शक्‍यता असते. आधीच बदलत्‍या जीवनशैलीमुळे वेगवेगळ्या आजारांचे प्रमाण वाढत असून, त्‍यात मूत्रपिंड विकारांचाही समावेश आहे.

निरोगी राहण्यासह मूत्रपिंडाचे विकार दूर ठेवण्यासाठी तसे तर वर्षभर काळजी घेणे आवश्‍यक असते. परंतु उन्‍हाळ्यात छोट्या-छोट्या उपाययोजनांतून मूत्रपिंडाचे आरोग्‍य सुदृढ राखता येऊ शकते.

हे आजार जडण्याची भीती

उन्‍हाळ्यात योग्‍य निगा राखली न गेल्‍यास लघवीचा संसर्ग (यूरिन इन्‍फेक्‍शन)पासून मुतखडा होणे, मूत्रपिंडाचे विविध आजार होण्याची शक्‍यता बळावते. प्रारंभी सौम्‍य वाटणारे हे आजार कालांतराने गंभीर रूप धारण करू शकतात.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

अशी घ्या काळजी, निरोगी राहा

उन्‍हाळ्यात भरपूर पाणी पिणे चांगले असते. परंतु एकाच वेळ खूप पाणी पिण्याऐवजी ठराविक वेळेनंतर पाणी सेवन करावे. शक्‍यतो बसून व सावकाश पाणी प्‍यावे. केवळ पाणी पिण्याने भागत नाही.

लिंबू सरबत, संत्र्याचा ज्यूस, कैरी पन्‍हे, आवळा सरबत आदींच्‍या माध्यमातून शरीराला आवश्‍यक घटक प्राप्त करून घेतले पाहिजेत. लघवी करताना काही अनियमितता जाणवल्‍यास मूत्रपिंड विकारतज्‍ज्ञांचा सल्‍ला घ्यायला हवा. सोबतच उन्‍हाळ्यात भूक लागण्याचे प्रमाण कमी होत असल्‍याने शक्‍यतो दिवसा रश्‍याची किंवा ओली भाजी सेवन करणे उपयुक्‍त ठरते.

आयु: सत्वबलारोग्यसुखप्रीतिविवर्धना: |

रस्या: स्निग्धा: स्थिर ह्रदय आहारा: सात्त्विकप्रिया: ||

भगवद्‌गीतेतील सतराव्‍या अध्यायातील आठव्‍या श्र्लोकात नमूद केल्‍याप्रमाणे सत्त्‍वगुण प्रकृतीच्‍या व्‍यक्‍ती अशा स्वरू‍पाचे भोजन पसंत करतात, ज्‍याने आयुष्य वाढते. सद्‌गुण प्राप्त होण्यासह शक्‍ती व स्‍वास्‍थ्‍यवर्धक, प्रसन्नता व समाधानाची वृद्धी होते. अशा स्वरूपाचे खाद्य रसरशीत, सरस, पौष्टिक व प्राकृतिक रूपाने स्‍वादिष्ट असतात.

"किती पाणी प्‍यावे, याचे साधेसोपे उत्तर म्‍हणजे लघवी पांढरी होईल इतके पाणी प्‍याले पाहिजे. उन्‍हाळ्यात घामामुळे क्षार व अन्‍य घटकांची कमतरता भासू लागते. त्‍यासाठी लिंबू सरबतापासून, संत्री, मोसंबीचा ज्यू‍स, कैरी पन्‍हे व अन्‍य पदार्थ उपयुक्‍त ठरतात. या कालावधीत मूत्रपिंडाचे विकार जडण्याची शक्‍यता अधिक असल्‍याने योग्‍य काळजी घेत व्‍याधींना दूर ठेवले पाहिजे."

-डॉ. किशोर वाणी, मूत्रपिंड विकारतज्‍ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance : आरोग्य विम्यावर ‘जीएसटी’चा भार; सर्वसामान्यांचे बिघडतेय आर्थिक गणित

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT