anti superstition committee
anti superstition committee esakal
नाशिक

Nashik: उताऱ्यातील कैऱ्यांचा घेतला चवीने आस्वाद! महाराष्ट्र अंनिसकडून अंधश्रद्धा विरोधात असेही प्रबोधन

सकाळ वृत्तसेवा

Nashik : कुटुंबावरील विघ्न दूर व्हावे किंवा इतरांवर ते विघ्न यावे या किंवा तत्सम हेतूने सात कैऱ्या अन् सात दगडांची रस्त्याच्या कडेला उतारा मांडून अंधश्रद्धा पसरविणाऱ्या अज्ञातांचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी डाव उधळला.

तसेच उतारा म्हणून ठेवलेल्या कैऱ्यांचा अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन आस्वाद घेत, कैऱ्या उताऱ्यासाठी नव्हे तर खाण्यासाठी असतात, असा संदेश दिला. (Awareness against superstition from Maharashtra andhashraddha nirmulan samiti by eating raw mangoes Nashik news)

सातपूर, सोमेश्वर कॉलनी परिसरात चारचाकी पार्क केल्या जात असलेल्या रस्त्याच्या कडेला अज्ञातांनी पानांवर सात कैऱ्या अन् दगड ठेवून त्यावर हळद- कुंकू टाकले होते. तसेच तिथे नैवेद्यही ठेवण्यात आला होता.

मंगळवारी (ता. १६) रात्री हा प्रकार उघडकीस आल्यावर परिसरातील नागरिकांमध्ये चर्चा रंगली, घबराट झाली. चारचाकी पार्किंगच्या जागेवर अशाप्रकारे कोणी पूजा केली असावी, यामागचा हेतू करणीचा तर हा प्रकार नसावा ना अशा अनेक चर्चा रंगल्या.

काहींनी तर हा ‘ब्लॅक मॅजिक’ चा प्रकार असावा, असाही संशय व्यक्त केला. भितीपोटी अनेक नागरिकांनी या ठिकाणी वाहने पार्किंग करणेही टाळले. या सर्व प्रकाराचे गांभीर्य ओळखून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे, प्रा. डॉ. सुदेश घोडेराव, महेंद्र दातरंगे, कोमल वर्दे, यशदा चांदगुडे यांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतली.

अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी परिसरातील नागरिकांना बोलावून त्यांचे प्रबोधन केले. अशा प्रकारच्या उताऱ्यामुळे समाजात अंधश्रद्धा पसरत असून, यातून काहीही साध्य होत नसल्याची बाब अंनिसच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना पटवून दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तसेच उताऱ्यात मांडलेल्या कैऱ्या धुवून त्याचा आस्वादही घेतला. तसेच, नागरिकांनी अशा प्रकारामुळे घाबरून जाऊ नये, परिसरात अंधश्रद्धेचा प्रकार घडत असेल तर अंनिसशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. अशा प्रकारची पूजा करून भितीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांचा परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेतला जात आहे.

यशदाचे कौतुक

अंनिसच्या कार्यकर्त्यांमध्ये लहानग्या यशदाचे मात्र सर्वांनीच कौतुक केले. यशदाने मनात कुठलीही भीती न बाळगता पूजेतील कैऱ्या उचलल्या. तसेच त्यांचा आस्वादही घेतला. अशा प्रकारच्या उताऱ्यामुळे विघ्न दूर होणे किंवा इतरांना त्यापासून इजा पोहोचवणे ही निव्वळ अंधश्रद्धा असल्याचा संदेशही तिने दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT