babasaheb purandare sakal
नाशिक

संग्रहालयातून पुरंदरे यांच्या अस्तित्वाची जाणीव

बाबासाहेबांनी नाशिककरांना दिला शिवकालीन मौल्यवान ठेवा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य नव्या पिढीच्या कायमस्वरूपी स्मरणात राहण्यासाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आयुष्यभर शिवकालीन ठेवा संकलित करण्याचे काम केले. त्या ठेव्यातील काही वस्तू बाबासाहेबांनी नाशिककरांकडे कायमस्वरूपी संग्रहालयात ठेवण्यासाठी दिल्या. बाबासाहेबांच्या निधनानंतर त्या इतिहास संग्रहालयातून कायमस्वरूपी अस्तित्वाची जाणीव राहणार आहे.

महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता असताना सामाजिक दायित्वाच्या निधीतून राज ठाकरे यांनी अनेक प्रकल्प आणले. त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे इतिहास संग्रहालयाचा महत्त्वपूर्ण उल्लेख करता येईल. बाबासाहेब पुरंदरे व राज ठाकरे यांची जुने ऋणानुबंध असल्याने बाबासाहेबांनी संकलित केलेल्या शिवकालीन वस्तूंचे कायमस्वरूपी संग्रहालय असावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.

त्याच अनुषंगाने राज ठाकरे यांनी शिवसेना प्रमुखांच्या नावाने इतिहासकालीन शस्त्र संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला. बाबासाहेबांच्या इच्छेनुसार संग्रहालयात इतिहासकालीन शस्त्रांचे कायमस्वरूपी प्रदर्शन भरविण्याचा निर्णय पक्का झाला. त्यानुसार सन २०१६ मध्ये गंगापूर रोडवरील जुने पंपिंग स्टेशन येथे संग्रहालयाचे पुरंदरे यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. मुंबईस्थित जीव्हीके कंपनीने दोन वर्षे करारानुसार संग्रहालयाची देखभाल केली. त्यानंतर सेवा ट्रस्टने एक वर्षांसाठी देखभालीचे काम घेतले. मध्यंतरी संग्रहालयातील वस्तू पुणे येथे स्थलांतरित करण्याची चर्चा होती.

युवापिढीला शिवकालीन इतिहास समजावा या उद्देशाने हाकेला साद देवून बाबासाहेबांनी संग्रहालयासाठी शिवकालीन वस्तू दिल्या. सध्या महापालिकेचे संग्रहालयाकडे दुर्लक्ष झाले असले तरी बाबासाहेबांनी नाशिककरांना दिलेला ठेवा जतन करण्यासाठी मनसेच्या वतीने प्रयत्न करू.

- सचिन भोसले, समन्वयक, मनसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Project Manager Arrest : थेट CMO कार्यालयातून फरफटत नेलं! 2 लाखांची लाच घेताना प्रोजेक्ट मॅनेजर रंगेहाथ पकडला; पहा थरारक व्हिडिओ

स्टार प्रवाहच्या 'या' अभिनेत्याला रितेशनं केला स्वत:हून फोन, आनंद व्यक्त करत म्हणाला...'रितेश सरांचा स्वत:हून फोन आला आणि...'

फिट्स नेमके मेंदूच्या कोणत्या भागातून सुरू होतात? ‘व्हिडिओ-ईईजी’च्या माध्यमातून शोधणार; केईएममध्ये २५ वर्षांत ७५० रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

Mumbai Metro: मेट्रो प्रवाशांसाठी खुशखबर! Uber अ‍ॅपवरून थेट तिकीट बुकिंग होणार; 50% सूटही मिळणार, पण कुठे?

Navi Mumbai: नवी मुंबईचे पाणी दर वाढणार? नवा दर लागू करण्याचा पालिकेचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT