नाशिक

पन्नास लाखांच्या आयुर्वेदिक तेलाचा साठा जप्त

CD
आयुवेदिक तेलाचा ५० लाखांचा साठा जप्त ‘एफडीए’ची कॉलेजरोडवर कारवाई; ५०४० बाटल्या ताब्यात सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ : सोशल मिडियाच्या माध्यमातून टक्कल असलेल्या व्यक्तींना केस उगवणे तसेच केसांची वाढ होते असा दावा करुन विक्री केल्या जाणाऱ्या आयुर्वेदिक तेलावर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाईचा बडगा ऊगारला आहे. प्रशासनाने या कारवाईत तेलाच्या शंभर मिलीच्या क्षमतेच्या ५ हजार ४० बाटल्या जप्त केल्या आहेत. या मालाची किंमत ५० लाख ३४ हजार ९६० रुपये इतकी आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या माहितीनुसार कॉलेज रोडवरील विसेमळ्यातील सहजीवन कॉलनीतील एका इमारतीमधून मे. व्ही. एस. न्यू फॅशन झोन या ब्युटी सलून व इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय सुरु होता. या सलूनतर्फे सोशल माध्यमातून केसांसाठीच्या तेलाची जाहिरात केली जात होती. याबद्दल विभागाला प्राप्त माहितीच्या आधारे उत्पादनाची पडताळणी करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाच्या पडताळणीत उत्पादनाच्या लेबलवर केवळ मार्केटेड बाय मे. व्ही. एस. न्यू फॅशन झोन, नाशिक असा उल्लेख असून बॅच क्रमांक, उत्पादन दिनांक व किंमत ९९९/- प्रति १०० मि.ली. असे नमूद होते. मात्र उत्पादकाचे नाव, पत्ता आणि उत्पादन परवान्याचा कोणताही तपशील नसल्याचे आढळून आले. संस्थेचा मालक योगेश भगत यांच्याकडे संबंधित आयुर्वेदिक उत्पादनाबाबत उत्पादन परवाना व इतर आवश्यक कायदेशीर परवनगी नसल्याने औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० अंतर्गत हा साठा जप्त केला आहे. तपासात निष्पन्न झालेल्या बाबींनुसार कारवाई केली जाईल, असे अन्न व औषध प्रशासनातर्फे सांगण्यात आले. --- आवाहनाला बळी पडू नये टक्कल घालवणे, केस उगवणे, वजन कमी करणे यासारखे भ्रामक दावे करणाऱ्या सोशल मीडियावरील जाहिरातींना नागरिकांनी बळी पडू नये. कोणतेही औषध खरेदी करताना त्याच्या लेबलवर उत्पादकाचे नाव, पूर्ण पत्ता व उत्पादन परवाना क्रमांक नमूद असल्याची खात्री करावी असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे. --------------------

MPSC Update: MPSC चा मोठा निर्णय! 11 हजार जागांची वाढ; तलाठ्यांच्या किती जागा? परीक्षा कधी? नव्याने अर्ज कधी करता येणार?

Solapur Accident: सोलापूर-पुणे महामार्गावर काळाचा घाला! कंटेनरला कारची धडक; आजी-आजोबा, सून अन् नातवाचा मृत्यू

Nashik Road Accident: रस्त्याचे काम सुरू असताना सुरक्षेकडे दुर्लक्ष; खोल खड्ड्यात ट्रॅक्टर पलटी, १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Pune Crime: ओतूर पोलिसांचा दुचाकी चोरट्यांना दणका! तीन आरोपी अटकेत; पाच लाखांच्या नऊ मोटारसायकली जप्त

Beed Crime: फेसबुकवरील साड्यांच्या जाहिरातीचा सायबर सापळा; ८.६४ लाखांची फसवणूक, दोन लाख रुपये होल्ड

SCROLL FOR NEXT