नाशिक

आयुषच्‍या तिसर्या प्रवेश यादीत ५ हजार ९६१ विद्यार्थ्यांना संधी

CD
पान-३ ३०-२ आयुषच्‍या तिसऱ्या प्रवेश यादीत ५ हजार ९६१ विद्यार्थ्यांना संधी -- आयुर्वेदमध्ये चार हजार, होमिओपॅथीत सोळाशे विद्यार्थी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.३ ः आयुष वैद्यकीय शिक्षणांतर्गत पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्ष प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. सहा हजार ६३४ जागा रिक्‍त असून, त्‍यासाठी या यादीत राज्‍यातील ५ हजार ९६१ विद्यार्थ्यांना प्रवेश संधी उपलब्‍ध केली आहे. निवड झालेल्‍या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक चार हजार प्रवेशोच्‍छूक आयुर्वेद (बीएएमएस) अभ्यासक्रमाचे आहेत. --------- आयुर्वेद (बीएएमएस), होमिओपॅथी (बीएचएमएस) आणि युनानी (बीयुएमएस) या तीन अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या जागावाटपाची तिसरी यादी जाहीर झाली आहे. त्यात तिन्ही अभ्यासक्रमाच्या राज्यात २०४ वैद्यकीय महाविद्यालयात १३ हजार ७५० जागांपैकी ७ हजार ११६ जागेवर पहिल्या व दुसऱ्या फेरीत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. प्रतीक्षेत असलेल्‍या ५ हजार ९६१ विद्यार्थ्यांना तिसऱ्या यादीत प्रवेशाची संधी आहे. यानंतरही ६७३ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा स्ट्रे राऊंडसाठी उपलब्ध असतील. होमिओपॅथीच्या तिसऱ्या यादीत राज्यात ५७ वैद्यकीय महाविद्यालयात ४ हजार ०१९ पैकी १ हजार ८४७ विद्यार्थ्यांना प्रवेश घेतला आहे. तिसऱ्या फेरीत १ हजार ६८३ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. यामध्ये ४८९ जागा रिक्त आहेत. युनानी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या यादीत राज्यात ८ वैद्यकीय महाविद्यालयात ४२८ जागांपैकी २२८ विद्यार्थ्यांना प्रवेश घेतला. तिसऱ्या फेरीत १९३ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून सात जागा रिक्‍त राहात आहेत. --- आयुर्वेदच्‍या ५४ टक्‍के जागांवर प्रवेश आयुर्वेद (बीएएमएस) अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या यादीत राज्यात उपलब्‍ध ९ हजार ३०३ जागांपैकी ५ हजार ०४१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. साधारणतः ५४ टक्‍के जागांवर प्रवेश झालेले असताना, तिसऱ्या फेरीत ४ हजार ०८५ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. यामध्ये १७७ जागा रिक्त आहेत. सहा शासकीय महाविद्यालयात ३२९, शासकीय अनुदानित/ महापालिकेच्या १७ महाविद्यालयात ८६० व विनाअनुदानित ११६ महाविद्यालयात २८९६ विद्यार्थ्यांना प्रवेशाची मिळाली संधी आहे. ---- इन्‍फोः प्रक्रिया पूर्ततेची आज मुदत तिसऱ्या फेरीत निवड झालेल्‍या विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात बुधवारी (ता.४) सायंकाळी साडेपाचपर्यंत आवश्‍यक मूळ कागदपत्र व शुल्‍क (धनाकर्षाद्वारे) प्रत्‍यक्ष उपस्‍थित राहून जमा करायचा आहे. व प्रवेश निश्‍चित करायचा आहे. ----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: ‘एकरी पाच हजारही उत्पन्न मिळणार नाही’; कपाशीची अवस्था पाहून आदित्य ठाकरे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

Bank New Rules: 'या' बँकेने बदलले नियम! 1 डिसेंबरपासून रोख रक्कम भरणे आणि काढण्यावरही मर्यादा

Animal Love Story: शर्यतप्रेमी मालक गेला अन् २४ तासांत लाडका बैलही गेला! २७ वर्षे एकमेकांची साथ; मालक अन् पाखऱ्याच्या नात्याची हृदयस्पर्शी कहाणी

Latest Marathi News Live Update: बनावट विदेशी मद्य साठ्याप्रकरणी आरोपींना न्यायालयीन कोठडी

VIDEO : तरुणांच्या आंदोलनांना ‘अराजक’ संबोधलं? तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवातील व्हिडीओवरून वाद

SCROLL FOR NEXT