नाशिक

बाभळे चौफुलीवर उड्डाणपूल व्हावा

CD
SGR26B07551 धुळे : खासदार शोभा बच्छाव यांना उड्डाणपूलाच्या मागणीचे निवेदन देताना ज्ञानेश्‍वर पाटील व सहकारी. -------- बाभळे चौफुलीवर उड्डाणपूल व्हावा सरपंचासह ग्रामस्थांचे डॉ. बच्छाव यांना निवेदन सकाळ वृत्तसेवा सोनगीर, ता. ८ : मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बाभळे (ता. शिंदखेडा) फाटा अपघात प्रवणक्षेत्र बनला असून, वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी उड्डाणपूल बांधण्यात यावा, त्यासाठी केंद्र शासन व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठपुरावा करावा, या मागणीचे निवेदन माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील व बाभळे ग्रामस्थांनी खासदार डॉ. शोभा बच्छाव यांना दिले. बाभळे फाट्यावर पुर्वेला बाभळे, वाघाडी ते थेट अमळनेर रस्ता असून, पश्चिमेला सार्वे, वायपूर, चिमठाणे रस्ता आहे. दक्षिण- उत्तर मुंबई- आग्रा असून, या चौफुलीवरून राष्ट्रीय महामार्गावरील भरधाव वाहतूक सुरू असते. त्याचवेळी मोठ्या प्रमाणात स्थानिक व परिसरातील विविध २० ते २५ गावातून येणाऱ्या औद्योगिक वसाहतीतील कर्मचारी व कामगार तसेच अवजड व मालवाहतूक वाहनांना मुंबई- आग्रा महामार्ग ओलांडावा लागतो. त्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. जनतेचा जीवित व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर येथे उड्डाणपूल व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांनी खासदार डॉ. बच्छाव यांच्याकडे केली आहे. ------ मुंबई आग्रा महामार्गावरील बाभळे फाट्यावर अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला. तर काहींना अपंगत्व आले. ही बाब महामार्ग यंत्रणेच्या निदर्शनास आली असून, उपलब्ध अपघातांची आकडेवारी, त्यासंबंधी नोंदी यांची तातडीने पुनर्तपासणी करणे गरजेचे आहे. - ज्ञानेश्‍वर पाटील, माजी सरपंच

SIR voter list: देशातील 42 निवृत्त न्यायमूर्तींचं खुलं पत्र! SIR वरुन सुरु असलेल्या वादावर स्पष्ट केली भूमिका

India Alliance Protest : 'देश हायजॅक केलाय, लोकशाहीची हत्या सुरूय'; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, आंदोलनासाठी 300 खासदार राजघाटावर

NANA PATEKAR: नाना पाटेकर रोज ६० सिगारेट ओढायचे; वयाच्या ५६व्या वर्षी सोडली सवय, पण हृदयाला झालेलं नुकसान भरून निघतं का? जाणून घ्या

Latest Marathi News Live Update: उदगीरमध्ये भरदिवसा दोन घरांवर डल्ला; सहा लाखांचा ऐवज लंपास

Nana Patekar Death : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे Cardiac Arrest ने निधन; हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टमध्ये काय फरक असतो? शरीरात नेमकं काय घडतं?

SCROLL FOR NEXT