नाशिक

शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी कुलस्वामिनी रेणुकामाता पतसंस्थेची स्थापना येवला : अध्यक्षपदी सर्वानुमते सिद्धांत दराडे यांची निवड;उपाध्यक्षपदी पवार,कार्यवाहपदी शिंदे

CD
कृपया आवश्यक... फोटो-27378 बाभूळगाव : कुलस्वामिनी रेणुकामाता विभागीय शिक्षक पतसंस्थेच्या उद्‍घाटनप्रसंगी आमदार किशोर दराडे, सहाय्यक निबंधक अर्चना शिंदे आदी. रेणुकामाता पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सिद्धांत दराडे सकाळ वृत्तसेवा येवला, ता. १ : कुलस्वामिनी रेणुकामाता विभागीय शिक्षक शिक्षकेतर सेवकांची पगारदार सहकारी संस्था मर्यादित या पतसंस्थेचे उद्‍घाटन बाभूळगाव येथे झाले. संस्थेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदी सिद्धांत दराडे, उपाध्यक्षपदी सुनील पवार तर कार्यवाहपदी नीलेश शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. शिक्षक आमदार किशोर दराडे व सहाय्यक निबंधक अर्चना शिंदे यांच्या हस्ते पतसंस्थेच्या कार्यालयाचे उद्‍घाटन झाले. त्यानंतर सहाय्यक निबंधक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेची पहिली सर्वसाधारण सभा झाली. सभेत संचालक मंडळाने सर्वानुमते पदाधिकाऱ्यांची निवड केली. नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालक मंडळाचा किशोर दराडे व अर्चना शिंदे यांच्या हस्ते सत्कार झाला. आमदार दराडे यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आकस्मिक अडचणी, वैद्यकीय उपचार तसेच अन्य गरजांसाठी अनेकदा आर्थिक मदतीची आवश्यकता असते. ही अडचण दूर करून नाशिक विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आर्थिक मदतीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, हा पतसंस्था स्थापनेमागील उद्देश असल्याचे सांगितले. श्रीमती शिंदे यांनी उपस्थितांना पतसंस्थेचा कारभार, सहकारी संस्थांचे नियम, नियमावली आणि पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शन केले. संस्थेचे संचालक संकेत दराडे, प्रशासकीय अधिकारी समाधान झाल्टे, प्राचार्य गोरक्षनाथ येवले, अरुण पैठणकर, बाळासाहेब राहणे, दादासाहेब मोरे, रामदास भड, हितेश गुजराथी, उत्तम जाधव, तुषार भागवत, वंदना संचेती, प्राची पटेल, सुनील खैरनार, साहेबराव होंडे, तुकाराम गवळी, जयश्री पालवे, रश्मी जोशी आदी उपस्थित होते. प्रदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladesh protests : बांगलादेशात पुन्हा असंतोषाचा उद्रेक! वेतनवाढीसाठी हजारो कामगार रस्त्यावर; ढाका-गाझीपूरमध्ये जाळपोळ

Nagpur Sarafa Bishnoi Gang Threat : नागपुरातील सराफांना बिश्नोई टोळीची धमकी, व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण

Drought Resistant Crop: दुष्काळात शेतकऱ्याला ओव्याचा आधार; कमी पाण्यात, कमी खर्चात हमखास उत्पन्नाची आशा

Pali Nagar Panchayat: करवाढीपूर्वी विकासकामांचा हिशेब द्या! अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली नगरपंचायतीवर २ नोव्हेंबरला धडकणार ‘संघर्ष मोर्चा’

Pune Rain Update : पुण्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला! औंधमध्ये जोरदार सरी, शहरातील अनेक भागांत पाऊस; पुणेकरांनी तारांबळ

SCROLL FOR NEXT