A family of clothiers in a banana garden. The banana in the second photo. esakal
नाशिक

Nashik News : गुजरातच्या परसबागेत केळीचा डंका!; द्यानेतील युवा शेतकऱ्याचा पारंपारिक शेतीला फाटा

- दीपक खैरनार

अंबासन (जि. नाशिक) : गुजरातची परसबाग म्हणून ओळख निर्माण केलेल्या मोसम पट्ट्यात जळगाव व केरळ राज्यातील उत्पादन होत असलेल्या गोड केळीने डंका वाढवला आहे. द्याने (ता. बागलाण) येथील राजेंद्र उर्फ बबलू कापडणीस या युवा शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देत दोन एकरावर केळीची लागवड करीत लाखोंचे उत्पादन घेतले आहे. (Bablu Kapadnis, young farmer broke traditional agriculture planted bananas on two acres got yield of lakhs Nashik news)

हेही वाचा : दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

जिद्द व चिकाटीच्या जोरावर अशक्य असे काहीच नाही. युवा शेतकरी राजेंद्र (बबलू) भरत कापडणीस यांचे वडिलोपार्जित अडीच एकर क्षेत्र आहे. काही वर्षांपूर्वी या क्षेत्रात पारंपरिक पीक वडील भरत कापडणीस घेत होते. पारंपरिक पीक पद्धतीत बदल करून त्यांनी डाळिंब लागवड केले होते. डाळिंबाची भरभराट असतानाच तेल्या व मर रोगामुळे डाळिंब बागेवर कुऱ्हाडीचे घाव घातले. त्यानंतर कांदा, मका पिक घेत असतानाच मुलगा राजेंद्र यांनी शेतातील पिकात बदल करून वेगळेपण सिद्ध करण्याचा निर्धार घेतला. जळगाव जिल्ह्यातून जी- ९ या वाणाची तीन हजार केळीची रोपे आणून सेंद्रिय पद्धतीने दोन एकरात लागवड केली.

कापडणीस कुटुंबियांच्या कष्टातून फुलविलेली केळी व्यापारी बांधावर खरेदी केली होती आणि पहिल्याच तोड्यात तब्बल नऊ लाखांचे भरघोस उत्पादन घेतले. दुय्यम व्यवसाय म्हणून वीस गुंठ्यात जनावरांसाठी चारा लागवड केला असून, गोठ्यात नऊ म्हशीचे संगोपन केले आहे. यामधून केळीच्या बागेत सेंद्रिय खत जागेवरच उपलब्ध होत आहे. केळीचा दुसऱ्या तोडा तयार झाला असून, यातून पंधरा लाखांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे कापडणीस कुटुंबियांनी सांगितले. शेतातील पारंपरिक शेतीला फाटा देत केळीचे भरघोस उत्पन्न घेऊन राजेंद्र कापडणीस यांनी युवा शेतकऱ्यांत आदर्श निर्माण केला आहे.

"आम्ही पारंपरिक शेती करीत होतो. त्यानंतर डाळिंब लागवड केली. मात्र, रोगराई पसरली आणि डाळिंब बाग तोडली. मुलाने केळी लागवड करण्याचा निर्णय घेतला. आज केळीतून भरघोस उत्पादन घेत आहोत."- भरत कापडणीस (राजेंद्रचे वडील)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात; सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Beed Baby News: मृत घोषित केलेलं बाळ रात्रभर दुर्लक्षित; दुसऱ्या दिवशी बॅगमध्ये टाकून नेलं, कुदळ सापडेना म्हणून झाला उशीर अन्...

तेजश्री प्रधानच्या झी मराठीवर दिसण्यावर स्टार प्रवाहच्या सतीश राजवाडेंची थेट प्रतिक्रिया; म्हणाले, 'ती नायिका आधी...

IND vs ENG 3rd Test: जो रूटचे विक्रमी शतक! भारतासमोर मजबूत भिंतीसारखा राहिलाय उभा; राहुल द्रविड, स्टीव्ह स्मिथचा विक्रम मोडला

SCROLL FOR NEXT