students esakal
नाशिक

गुणवंत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणार दोन लाखांची शिष्यवृत्ती

प्रशांत बैरागी

नामपूर (जि.नाशिक) : अनुसूचित जाती प्रवर्गातील दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी अकरावी व बारावी या दोन वर्षांत प्रत्येकी एक लाख याप्रमाणे दोन लाख रुपयांचे अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टीमार्फत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे. ग्रामीण भागातील पालकांनी शासन निर्णयाचे स्वागत केले आहे. (backward-class-students-will-get-scholarship-nashik-marathi-news)

विद्यार्थिहिताची योजना

या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे, अशी प्रमुख अट आहे. अनुसूचित जातीतील गरीब कुटुंबातील मुलांना एमएचसीईटी, जेईई, एनईईटी यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पूर्वतयारीसाठी ही रक्कम लाभदायक ठरणार आहे. याबाबत विद्यार्थी व पालक संघटनांकडून करण्यात येणारी मागणी पाहता शासनाने विद्यार्थिहिताची योजना लागू केली आहे.

लाभार्थी संख्या अमर्यादित

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरू करण्यात येत असलेल्या या योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ मिळावा, यासाठी व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात येत आहे. शासकीय सेवेत नोकरीला असणाऱ्या पालकांच्या पाल्यांना ही योजना लागू असणार नाही. उत्पन्नाचा व जातीचा प्रमाणित दाखला देणे अनिवार्य असणार आहे. विशेष म्हणजे या योजनेमधील लाभार्थिसंख्या अमर्यादित असणार आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

उच्च शिक्षणासाठी फायदेशीर

असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या, कमी पगारावर किंवा कंत्राटी स्वरूपात किंवा खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरणार असून, या योजनेची पारदर्शक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांची असणार आहे. या योजनेचा लाभ तळागाळातील गरीब कुटुंबांतील गुणवंत विद्यार्थ्यांना आपले भविष्य घडविण्यासाठी मिळावा, यासाठी न्याय व सामाजिक खात्याने अग्रक्रम दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

Latest Marathi News Live Update : कोकणातही दुष्काळाची परिस्थिती; भातपिकाला मोठा फटका

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT