Potholes on road reference latest marathi news esakal
नाशिक

रावळगाव शिवारातील पांधन रस्त्यांची दुरावस्था

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : रावळगाव (ता. मालेगाव) येथील आठवडे बाजारापासून- नागदेव ते डंकणी ह्या पांधन रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर पावसामुळे (rain) ठिकठिकाणी मोठे खड्डे (Potholes) पडले आहेत. हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी वेळोवेळी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे करण्यात आली आहे. तरीही या रस्त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. (Bad condition of Pandan roads in Rawalgaon area nashik Latest Marathi news)

पांधण रस्ता दुरुस्त करुन देण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे. पांधन रस्त्यावर या भागातील बहुतांश शेतकरी व मजूर ये- जा करतात. या ठिकाणी दळवी वस्ती व ६६ बंगला भागात नागरीक राहतात.

दळणवळणाचा एकच रस्ता असल्याने या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसात या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने दुचाकी खड्ड्यात जाऊन आदळली. त्यामुळे अपघातही झाले. या रस्त्याचा प्रामुख्याने शेतकरी, विद्यार्थी व मळ्यात राहणारे नागरीक वापर करतात.

यापुर्वीही ग्रामपंचायतीकडे तक्रार केली असून, ग्रामपंचायतीचा निधी नसल्याने रस्त्याचे काम झाले नाही. अनेकवेळा परिसरातील शेतकऱ्यांनी स्वखर्चातून रस्त्याची दुरुस्ती केली. सध्या रस्त्यावर मोठे खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्याचे डांबरीकरण किंवा खडीकरण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

स्टार प्रवाहवरील अभिनेत्रीची झी मराठीच्या 'सनई चौघडे' मध्ये एंट्री; पहिल्यांदा साकारणार आईची भूमिका

Pre Sleep Habits: दिवसभराचा थकवा आणि चिडचिड घालवायची असेल, तर झोपण्यापूर्वी 'या' गोष्टींना करा कायमचा टाटा!

Latest Marathi News Live Update: ५०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकेचा करमाफीचा प्रस्ताव फेटाळला

LPG Gas: उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलोय, मला सिलिंडर द्या...; अधिकारी असल्याचे भासवले; एजन्सीमधून सिलिंडर घेऊन पळून गेले

SCROLL FOR NEXT