destoryed playground in Saigram Park. esaka
नाशिक

Nashik News : उद्यानांची दुरवस्था टवाळखोरांच्या पथ्यावर; खेळणी, ग्रीन जिम साहित्यांची मोडतोड

सकाळ वृत्तसेवा

सिडको (जि. नाशिक) : प्रभाग २७ मधील साईग्राम उद्यानांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी काही खेळण्यांची दुरवस्था, तर ग्रीन जिमच्या साहित्याची मोडतोड झाल्याचे दिसून येत आहे. उद्यानात रात्री मद्यपींचा वावर असून, दिवसा प्रेमीयुगुल ठाण मांडून बसले असल्याचा आरोप स्थानिकांमधून करण्यात येत आहे. साईग्राम उद्यानात कचऱ्याच्या साम्राज्यामुळे बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. (Bad condition of parks Debris of toys green gym materials Nashik News)

साईग्राम परिसरात सुमारे अडीच ते तीन हजार नागरिक राहतात. या परिसरात गेल्या काही वर्षा आधी लाखो रुपये खर्च करून सुंदर असे उद्यान बनवले आहे. मात्र, उद्यानाकडे मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. या ठिकाणी उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याने येथे सरपटणारे जनावरेहीदेखील आढळत असतात.

उद्यानाची दुरवस्था पाहून या ठिकाणी रात्री काही टवाळखोर दारूच्या पार्ट्या करतात. यामुळे स्थानिक नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. महिलांना सांयकाळी उद्यानातदेखील येत नाही. परिसरात नागरिकांना उद्यानाचा कोणत्याही प्रकारे वापर करता येत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

ग्रीन जिम साहित्य तुटलेले

प्रभाग २७, साईग्राम उद्यान

* उद्यानातील पथदीप बंद अवस्थेत
* मद्यपींचा रात्रीच्या सुमारास त्रास
* दिवसा प्रेमीयुगुलांचा वावर
* उद्यान परिसरात रोडरोमिंयोंचाही धिंगाणा
* उद्यानात विषारी प्राण्यांचा वावर
* काही खेळणी, ग्रीन जिम साहित्य तुटलेले
* झाडांची छाटणी वेळोवेळी होत नाही.
* पोलिसांची गस्त नाही.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

"उद्यानातील खेळणी तुटलेल्या अवस्थेत असून ग्रीन जिमचे साहित्यदेखील नादुरुस्त आहे. याबाबत नाशिक महापालिका प्रशासनास वेळोवेळी कळूनही काही उपयोग होत नसल्याने तक्रार करायची तरी कोणाकडे, असा प्रश्न उपस्थित होत आहे."- मनोज आहेर, स्थानिक रहिवासी

"उद्यानामधील वृक्षांची वेळोवेळी छाटणी होणे गरजेचे असताना असे मात्र होत नसल्याने येथे कचऱ्याचे साम्राज्य मोठ्या प्रमाणावर निर्माण होत असते. तर यामुळे उद्यानांमध्ये विषारी प्राण्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर दिवसेंदिवस वाढत आहे."- अमोल मोरे, रहिवासी

"उद्यान परिसरामध्ये दिवसा प्रेमीयुगुल, तर रात्री मद्यपींचा वावर असतो. यामुळे परिसरातील महिलांना उद्यानात येण्यासाठी विचार करावा लागत असून नाशिक महापालिका व पोलिस प्रशासनाने यावर लक्ष देणे गरजेचे आहे." - दीपक गवळी, रहिवासी

"उद्यानाच्या अवतीभवती रोडरोमिओंचा धिंगाणा सुरू असून उद्यानाच्या काही संरक्षण भिंतीदेखील तुटलेल्या अवस्थेत आहे. या परिसरात रात्री पोलिस गस्त होणे गरजेचे आहे."
- प्रवीण गोरे, रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रात्री 3 वाजता सशस्त्र दरोडा, प्रतिकार करणाऱ्या पितापुत्रावर चोरट्यांनी चाकूने केले वार, सीसीटीव्ही व्हिडीओ समोर....

नात्यांच्या गुंत्यातील मनोव्यापार उलगडणाऱ्या ‘माया’चा टीझर प्रदर्शित!

Mumbai: वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडवर नवीन पूल होणार; वीर सावरकर उड्डाणपुलावरून जाणार, कुठे आणि कसा जोडणार?

मी दोघींना विहिरीत ढकललं, तरुणाने गावकऱ्यांना स्वत:च सांगितलं; १५ वर्षीय मुलींचा बुडून मृत्यू, जळगाव हादरलं

T20 World Cup विजेत्या खेळाडूची निवृत्तीची घोषणा; भारताविरुद्ध खेळलेला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना

SCROLL FOR NEXT