Potholes on the road leading from the market committee to the rural hospital. esakal
नाशिक

Nashik News : लासलगाव ग्रामीण रुग्णालयाच्या रस्त्यांची दुरवस्था; बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

लासलगाव (जि. नाशिक) : माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील दत्तक लासलगावातील ग्रामीण रुग्णालयाकडील रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. अनेक वर्षांपासून लासलगाव नवीन बाजार समितीशेजारील ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांकडे बांधकाम विभागाने सपशेल दुर्लक्ष होत आहे. (Bad condition of roads of Lasalgaon Rural Hospital Neglect of construction department Nashik News)

त्यामुळे हे खड्डे आता रुग्णाच्या जीवावर उठले आहेत. रोज येथील ग्रामीण रुग्णालयात मोठ्या संख्येने नागरिक उपचारासाठी येत असतात. मात्र येथील वर्दळीच्या रस्त्यांची अनेक महिन्यांपासून दुर्दशा झाली आहे. रात्री रुग्णांना पथदीप नसल्याने अंधारात जीव मुठीत धरुन जावे लागत आहे.

या रस्त्यालगत पथदीपांची व्यवस्था करण्याची मागणी अनेक महिन्यांपासून नागरिकांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षेमुळे रुग्णांची हेळसांड होत असून, हा रस्ता शेवटच्या घटका मोजत आहे.

संबंधित रस्ता १४ वर्षापासून रखडलेल्या बायपास रस्त्याशी संलग्न असून या रस्त्यावर प्रामुख्याने नाफेड, वखार महामंडळ, लासलगाव ग्रामीण रुग्णालय असल्याने लासलगाव-विंचूर रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी हा रस्ता होणे जरुरीचे आहे.'

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

रस्त्यांवर ऐन वर्दळीच्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमधून वाहन उसळून अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. रस्त्याने जाणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांची चाके या खड्ड्यात आदळून वाहनांचा खुळखुळा होत आहे. सोबतच वाहनावर बसलेल्यांनाही पाठीच्या दुखण्याला सामोरे जावे लागत आहे.

"सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याची वाट लागली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याची अवस्था खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डा अशी झाली असून रात्री वीज नसल्याने रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात जाण्यास मोठा त्रास होत आहे. बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन सदरचा रस्ता वापरण्यायोग्य करावा. संबंधित विभागाने पंधरा दिवसांत लक्ष न दिल्यास या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात येईल."प्रवीण कदम, सामाजिक कार्यकर्ते, लासलगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Tariff: तर हा आहे अमेरिकेचा मास्टर प्लॅन, भारतावर का लावला टॅरिफ? पत्रकार परिषदेत सांगतिलं कारण

Pune Rain Update : पावसाचा जोर पुण्यात ओसरला; कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ

Khadakwasla Dam : पावसाचा जोर ओसरला, खडकवासला धरणातून विसर्गात घट

Solapur Fraud: गृहनिर्माणची जागा परस्पर विकून २७ लाखांचा अपहार; २२ जणांवर गुन्हा, शासनाची फसवणूक

Solapur Accident: 'नान्नजच्या अपघातग्रस्त शेतकऱ्याचा अखेर मृत्यू'; दुचाकीच्या समोर कुत्रा आडवा आल्याने अपघात

SCROLL FOR NEXT