Bad quality road in merdand
Bad quality road in merdand esakal
नाशिक

मेरदांड रस्त्याचे काम निकृष्ट; निव्वळ हातानेच रस्ता दाखवला उखडून

हिरामण चौधरी

पळसन (जि. नाशिक) : पळसनजवळील मेरदांड रस्त्याचे डांबरीकरणाचे काम (Asphalting Work) निकृष्ट दर्जाचे सुरू असून, निव्वळ हातानेच रस्ता ग्रामस्थांनी उखडून दाखविला. त्यामुळे तालुक्यात पुन्हा एकदा रस्ता कामाच्या दर्जाविषयी प्रश्न उपस्थित केला जात आहे. हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत (Mukhyamantri Gramsadak Yojana) झाला असून, रस्त्यांची अंदाजित किंमत १२७.२२ लक्ष आहे. (Bad Quality road built in merdand Nashik News)

ग्रामविकास मंत्रालयातर्फे अर्थसंकल्पीय प्रकल्प रस्ता झाला. मात्र, एक ते दोन दिवसांतच रस्ता उखडून गेला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. या रस्त्याच्या कामाचे उद्‌घाटन मोठ्या दिमाखात विधानसभेचे उपाध्यक्ष, कळवण- सुरगाणाचे मतदारसंघाचे आमदारांच्या हस्ते झाले होते. कार्यकारी अभियत्यांचे दुर्लक्ष झाल्याने मेरदांड रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. किमान पावसाळा येईपर्यंत तरी काम टिकावे एवढीच अपेक्षा पळसन ग्रामपंचायतचे सदस्य भास्कर जाधव, सामाजिक कार्यकर्ता सोमनाथ जाधव, चिंतामण वाघमारे, नामदेव पाडवी, प्रकाश जाधव, भागवत जाधव, लहानू बाऱ्हे, मधुकर वार्डे, नारायण वारडे, अशोक लोखंडे, चंद्रकात वाघमारे व परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. या रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराने एका रात्रीत केल्याचा आरोप केला जात आहे.

डांबराऐवजी ऑईलसारखे पाणी वापरले जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्यावरील धूळ न झाडताच रस्ता केला. त्यामुळे डांबर रस्त्याला चिकटलेले नाही. त्यामुळे संबंधित कार्यकारी अभियंता व ठेकेदाराच्या संगनमताने हे काम निकृष्ट झाल्याने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे पितळ उघडे पडले आहे.

"रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून झाले असून, रस्त्यावरील धूळ न झटकताच त्यावरून डांबरीकरण केले आहे. खडीवरून टाकलेला डांबराचा थर २० एमएम पाहिजे होता. कररूपाने मिळणारा पैसा आदिवासी जनतेला उपयोगात आला पाहिजे. निव्वळ आदिवासी जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचाच प्रकार आहे. केवळ निकृष्ट दर्जाची कामे करून ठेकेदार पोसण्याचे काम सुरू आहे का? या कामात सुधारणा घडवून न आणल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार करणार आहे."

- एन. डी. गावित, आदिवासी विकास आघाडीप्रमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT