SYSTEM
नाशिक

‘काय सांगू भो... रस्त्यावर चालणंही कठीण व्हई बसणं! खड्डे बुजणार कधी...?

दिपक खैरनार

अंबासन : ‘काय सांगू भो... रस्त्यावर चालणंसुद्धा कठीण व्हई बसनं... गाडी कशी चालाडानी तेच कळत नही...’ अशी प्रतिक्रिया परिसरातील रस्त्यावरून प्रवास करणारे व्यक्त करीत आहेत. पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांकडे संबंधित विभागाकडून डोळेझाक केली जात असल्याचा आरोप वाहनचालकांसह नागरिकांकडून केला जात आहे. खड्ड्यांची डागडुजी व पुलाची दुरूस्ती होणार तरी कधी, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

पावसाळा सुरू होताच ठिकठिकाणी रस्त्यावरील खड्डे, उघडे पडलेले फरची पुल आणि पुलाचा आजूबाजूस असलेला भराव वाहून गेल्याचे चित्र आहे. यामुळेच संबंधित ठेकेदारांनी केलेल्या कामाचीही पोलखोल होत असल्याचे उघड होत आहे. वळवाडे ते अंबासन गावापर्यंत असलेल्या पुलाचा भराव सलग दोनवेळा वाहून गेला आहे. या पुलाचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. दरम्यान, गेल्या पाच वर्षात संबंधित ठेकेदारांकडून कुठलीही दखल घेतली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत झालेल्या कामात पाच वर्षांच्या कालावधीनंतर सदर रस्ता बांधकाम विभागाकडे वर्ग झाल्याचे एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

आखतवाडे गावाजवळील करंजाडी नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात पुलावरून पुरपाणी वाहत असल्याने वाहनचालकांसह विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. या पुलाची उंची वाढवून संरक्षक कठडे लावण्याची मागणी आखतवाडे, बिजोटे, करंजाड, आनंदपुर, भुयाणे, निताणे आदी गावातील ग्रामस्थांकडून केली जात आहे. काकडगाव गावानजीक असलेल्या भारत गॅस गोडाऊनजवळील नव्यानेच बांधकाम केलेल्या फरशी पुलाची अवस्था दयनीय झाली आहे. पाईपमधून पुरपाणी जात नसल्याने या पाण्यातून वाहनचालकांना मार्गस्थ व्हावे लागते. खड्डे बुजवावेत व पुलाची दुरूस्ती करावी. अशी मागणी केली जात आहे.

''गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही पुलाच्या दुरूस्तीबाबत पाठपुरावा करीत आहोत. मागील काळात पुरपाण्यामुळे पुलाचा काही भाग वाहून गेला होता. त्यानंतर संबंधित विभागाने मातीचा भराव टाकला. दुसऱ्याच वर्षात पुरपाण्याने पुन्हा भराव वाहून गेला आहे.'' - नानाभाऊ राऊत, उपसरपंच, वळवाडे

''आखतवाडे गावाजवळील पुलाची उंची कमी असल्याने वाहनचालकांसह शालेय विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. पुरपाणी आल्यास पुलावरून पुरपाण्यातून मार्गस्थ व्हावे लागते. नव्यानेच पुलाची निर्मिती होणे अपेक्षित आहे.'' - बळीराम जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य, बिजोटे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT