नाशिक

बागलाणमध्ये दोन हजार शेतकऱ्यांची नुकसानभरपाई रखडली महाऑनलाइन पोर्टलचा तांत्रिक बिघाड; आधार सीडिंगअभावी आणखी एक हजार शेतकरी प्रतीक्षेत

CD
मेन बागलाणला २ हजार शेतकऱ्यांची मदत रखडली --------------------------------------- ई केवायसी नसल्याने गारपीटग्रस्त मदतीपासून वंचित रोशन खैरनार : सकाळ वृत्तसेवा सटाणा ता.२६ : बागलाण तालुक्यात मार्च-एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या जवळपास दोन हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया रखडली आहे. तर, ई-केवायसी पूर्ण केलेल्या एक हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाचे बँक खात्याशी सीडिंग नसल्याने मदतीची रक्कम जमा होण्यात अडचणी येत आहेत. महसूल विभागाने मार्च-एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल दिला. शासनाकडून अनुदान मंजूर झाले; मात्र ऑगस्टपासून पोर्टलवर ई-केवायसी करताना अडचणी येत असून बायोमेट्रिक यंत्रावर अंगठ्याचा ठसा स्वीकारला जात नसल्याने तसेच मोबाईलवर ओटीपी सुद्धा येत नसल्याने अनेक शेतकऱ्यांची प्रक्रिया अपूर्ण आहे. ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना सीएससी आणि महा-ई-सेवा केंद्रांवर वारंवार हेलपाटे मारावे लागत आहे. त्यामुळे प्रवासाचा खर्च आणि वेळ वाढत असून, शेतीच्या कामांवरही परिणाम होत आहे. ई-केवायसी पूर्ण असूनही आधार-बँक खाते सीडिंग नसल्यामुळे एक हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रश्न कायम आहे. बागलाण तालुका दुष्काळी जाहीर झाल्याने शेतकऱ्यांसमोरील आर्थिक आव्हाने वाढली आहेत. नैसर्गिक आपत्तीला सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटूनही शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. कोट शासनाने महाऑनलाइन पोर्टलमधील तांत्रिक बिघाड तत्काळ दूर करून वंचित शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया सुरू करावी; अन्यथा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. - केशव मांडवडे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष ई-केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू आहे. पोर्टल पूर्ववत झाल्यानंतर वंचित शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण करता येईल. ज्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे, त्यांच्या खात्यांवर मदतीची रक्कम वर्ग झाली असून ज्या शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाचे बँक खात्याशी सीडिंग झालेले नाही, त्यांनी ते तातडीने करून घ्यावे. - कैलास चावडे, तहसीलदार बागलाण पिकांचे नुकसान झाल्याने आर्थिक परिस्थिती बिकट आहे. सीएससी केंद्रावर वारंवार जाऊनही प्रक्रिया होत नाही. घरातील खर्च, शेतीचे नुकसान आणि दिवाळीचा सण यांचा मेळ कसा घालायचा, हा प्रश्न आहे. शासनाने आमची थट्टा थांबवून नुकसानभरपाईची रक्कम तातडीने मिळवून द्यावी. - दत्तू सोनवणे, नुकसानग्रस्त शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाचे 5 मोठे अपडेट्स! केंद्रीय कर्मचारी-पेन्शनधारकांसाठी काय महत्त्वाचं?

Vishwajeet Kadam Warning to Government : सांगलीला पाणी द्या! "कोणी आडवं आलं तर गाठ माझ्याशी!"; विश्वजीत कदमांचा मंत्री शंभूराज देसाईंना थेट इशारा!

टोरंट प्रकल्पाविरोधात शिवसेनेचा एल्गार! कर्जतच्या जंगलातील वृक्षतोडीवरून आक्रमक भूमिका; सत्ताधाऱ्यांना घेरले

SHUKRA UDAY 2026 ASTRO PREDICTIONS: नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच ‘या’ ३ राशींचं नशीब चमकणार? शुक्राच्या उदयाने धनलाभासह करिअरमध्येही येणार प्रगतीचे योग!

Maharashtra Live News: बंद कार्डधारकाचा माल पूर्ववत करण्यासाठी काँग्रेसचे धरणे

SCROLL FOR NEXT