Bulls Pair esakal
नाशिक

Bail Pola Festival: ज्याच्या दारी बैलजोडी, तोच खरा शेतकरी...! ‘ट्रॅक्टर’च्या युगातही सर्जा-राजाशी नाळ कायम

दत्ता जाधव

Bail Pola Festival : बदलत्या काळात शेतीचे छोट्या- छोट्या तुकड्यांत रूपांतर झाल्याने जनावरे सांभाळून त्यांची देखभाल करणे बळीराजासाठी अवघड बनले. त्यामुळे अनेक ठिकाणी सर्जा- राजाची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे.

परंतु याही स्थितीत शेतकऱ्याची नाळ सर्जा-राजांशीच असल्याने बैलपोळ्याचे महत्त्व कालौघात कमी झाले असले तरी बळीराजाची आपल्या प्राणप्रिय बैलांवरील प्रेम व निष्ठा तसूभरही कमी झालेले नसल्याने ट्रॅक्टरच्या युगातही सर्जा- राजाचे महत्त्व टिकून आहे. (Bail Pola Festival strong bond with Sarja Raja remained even in era of Tractor nashik)

ऐंशीच्या दशकापर्यंत महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात एकत्र कुटुंब पद्धती टिकून होती. शेतीची वाटणी झालेली नसल्याने अनेक कुटुंबाकडे मोठ्या प्रमाणावर जमिनी होत्या. अगदी छोट्या शेतकऱ्याकडेही पाच सहा एकर जमीन होती.

या काळात शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर बैलांचीच मदत घेतली जात असे. त्यामुळे अगदी छोट्या शेतकऱ्यांकडेही दोन- चार बैल, गायी, शेळ्या, बकऱ्या, कोंबड्या असायच्या. ज्या शेतकऱ्याकडे अधिक पशुधन तो श्रीमंत मानला जाई, यावरून पशुधनाचे ग्रामीण भागातील तेव्हाचे महत्त्व लक्षात येते.

त्यानंतर एकत्र कुटुंब पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होऊ लागल्यावर शेतीचेही छोटे- छोटे तुकडे झाले. त्‍यामुळे अनेकांना पशुधन सांभाळणे जिकिरीचे झाले. जमिनीचे तुकडे झाल्याने घरचा चारा कमी पडू लागला, तर दुसरीकडे बाहेरील पशुखाद्याच्या दरांतही मोठी वाढ झाली.

मात्र बदलत्या स्थितीतही अनेक शेतकऱ्यांनी प्रसंगी पोटाला चिमटा घेतला, परंतु काम नाही, म्हणून बैलांची विक्री केली नाही. तर या मुक्या जिवामुळेच प्रगती झाल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जनावरे हीच खरी संपत्ती

शेतीतील बैलाचे महत्त्व कमी झालेले असले तरी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या दारात खिल्लारी जोडी दिमाखाने दाराबाहेर उभी आहे.

आज मोठ्या प्रमाणावर यांत्रिकी पद्धतीने शेती केली जात असली तरी ‘ज्याच्या दारी बैलजोडी, तोच खरा शेतकरी’ असे सांगून बैलांशिवाय शेती नाही, असे मत पळसे येथील रामदास सहाणे या शेतकऱ्याने नोंदविले तर गाय, बैल आदी जनावरे हीच शेतकऱ्याची खरी संपत्ती असल्याची प्रतिक्रिया सांजेगाव येथील पंडित गोवर्धने या शेतकऱ्याने व्यक्त केली.

आज शहरी भागात आलेल्या आडगाव, म्हसरूळ गावात वीस तीस वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर पशुधन होते. पोळ्यांच्या दिवशी शेतातून खास सजविलेल्या सर्जा-राजाची घरापर्यंत सवाद्य मिरवणूक काढली जात होती.

आडगावच्या वेशीवर सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी जमत असे. कालौघात बैलाची जागा अनेक ठिकाणी घोड्याने घेतलेली दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT