फोटो : H31600
------------------------------------------------
बजाज इलेक्ट्रिकलच्या कामगारांचे उपोषण
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन; आरपारच्या लढाईचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ७ : गोंदे दुमाला (ता. इगतपुरी) येथील बजाज इलेक्ट्रिकल कंपनी व्यवस्थापनाने शंभराहून कामगारांना कमी केले. कंपनी व्यवस्थापनाविरोधात कामगारांनी बुधवारपासून (ता. ७) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. यावेळी कामगारांनी आरपारची लढाई लढण्याचा निर्धार करताना कामा वर पूर्ववत करा, अन्यथा मरण्याची परवानगी द्या अशी आक्रमक भूमिका घेतली.
बजाज इलेक्ट्रिकल कंपनीने एकावेळी शंभराहून कामावरून कमी केले. कंपनीच्या या धोरणाविरोधात संबंधित कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. स्वराज्य पक्षाच्या मार्गदर्शनाखाली संबंधित कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केले. या कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात कामगारमंत्री आकाश फुंडकर आणि कामगार आयुक्तालयाने कामगारांना पूर्ववत कामावर रुजू करून घेण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. तरीही कंपनी व्यवस्थापनाने प्रशासकीय निर्णयांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून वेतन पूर्णपणे बंद असल्याने कामगारांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. बँकेचे हप्ते, घरभाडे, मुलांची शाळा-कॉलेजची फी व वैद्यकीय खर्च भागवणे अशक्य झाल्याची व्यथा कर्मचाऱ्यांनी मांडली. आंदोलनाप्रसंगी स्वराज पक्षाचे डॉ. रूपेश नाठे-पाटील, केशव गोसावी, ज्ञानेश्वर थोरात, रोशन खैरे, नितीन पाटील, सागर पवार, रेखा जाधव यांच्यासह इतर कामगार उपस्थित होते.
---
प्रमुख मागण्या
जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः उपोषणस्थळी भेट द्यावी
-जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत न्याय मिळवून द्यावा
-बजाज इलेक्ट्रिकल व्यवस्थापनासाठी चर्चेचे दार उघडे
-न्याय मिळेपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका
---------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.