नाशिक

बजाज इलेक्ट्रिकल्सचे कर्मचारी मागण्यांवर ठाम

CD
बजाज इलेक्ट्रिकल्सचे कर्मचारी मागण्यांवर ठाम आंदोलन कायम : स्वेच्छानिवृत्ती घेतल्याचा कंपनीचा दावा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ९ : गोंदे दुमाला (ता. इगतपुरी) येथील बजाज इलेक्ट्रिकलच्या कर्मचाऱ्यांनी कामावर पूर्ववत घ्यावे, या मागणीसाठी आंदोलन पुकारले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवसांपासून हे कर्मचारी आंदोलन करीत असून, मागण्यांवर ते ठाम आहेत. दरम्यान, आंदोलनावर कंपनी व्यवस्थापनाने भूमिका स्पष्ट करताना संबंधित कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याचे स्पष्ट केले. बजाज इलेक्ट्रिकलच्या १०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी कंपनी व्यवस्थापनाविरोधात एल्गार पुकारला आहे. कामावर परत घेण्याची मागणी करीत त्यांनी आंदोलन सुरू केले. या आंदोलनावर कंपनी व्यवस्थापनाने निवेदन दिले. त्यात नोंदणीकृत कर्मचारी संघटनेशी आवश्यक चर्चा करून कंपनीने फेब्रुवारी २०२५ मध्ये स्वेच्छानिवृत्ती योजना लागू केली. त्यात ८८ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली; तर २७ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला. त्यानंतर त्यांना कंपनीकडून देण्यात आलेल्या सर्व वैधानिक देयकांसह आणि अतिरिक्त सानुग्रह लाभांसह त्यांचा पूर्ण व अंतिम हिशेब अदा करण्यात आला. स्वेच्छानिवृत्तीनंतर नऊ महिन्यांनी ४१ माजी कर्मचाऱ्यांनी पुनर्नियुक्तीची मागणी करीत कामगार प्राधिकरणाकडे दाद मागितली. परंतु, स्वेच्छानिवृत्तीवेळी संबंधितांना सर्व देयके दिल्याने व अंतिम निपटारा झाल्यावर पुनर्नियुक्ती करणे शक्य नसल्याची भूमिका कंपनीने घेतली आहे. औद्योगिक सौहार्द कायम राखण्याच्या दृष्टीने, बजाज इलेक्ट्रिकल्सने ४१ माजी कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कंत्राटदारामार्फत पर्यायी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यास सहमती दर्शविली आहे. सहायक कामगार आयुक्तांच्या कार्यालयाने संबंधित व्यक्तींना कंत्राटदारामार्फत उपलब्ध करून दिलेल्या व्यवस्थेबाबत कळविले होते. पण, तरीही एकाही व्यक्तीने ही संधी स्वीकारली नसल्याचे स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Raiway Tickets: GNWL, RLWL, PQWL, TQWL! रेल्वे तिकिटावर दिसणारे हे कोड असतात तरी काय? जाणून घ्या त्यांचा अर्थ

MPSC Student Agitation : परवानगी रद्द केल्यानंतरही आंदोलन; ‘एमपीएससी’ आंदोलक विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Maharashtra Live News : मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक; लोकल गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

गुलाबजामच्या पाकात उंदीर, भिवंडीतील मिठाईच्या दुकानात किळसवाणा प्रकार; Video Viral होताच एफडीएचा छापा

IND vs WI 2nd T20I: वैभव सूर्यवंशीला आज तरी संधी मिळाली का? श्रेयस अय्यरने जाहीर केली Playing XI, विंडीजच्या संघात एक बदल

SCROLL FOR NEXT