नाशिक

त्या कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्या : बजाज इलेक्ट्रिकल्स्‌

CD
‘त्या’ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्या बजाज इलेक्ट्रिकल्स कंपनी व्यवस्थापनाचे स्पष्टीकरण सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १० : गोंदे-दुमाला (ता. इगतपुरी) येथील बजाज इलेक्ट्रिकलच्या कर्मचाऱ्यांनी कामावर पुर्ववत घ्यावे या मागणीसाठी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनावर कंपनी व्यवस्थापनाने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. आंदोलनकर्ते कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली असून कंपनी नियमानुसार त्यांची पुनर्स्थापना करणे शक्य नसल्याचे कंपनी व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले. बजाज इलेक्ट्रिकलचे शंभराहून कर्मचाऱ्यांनी कंपनी व्यवस्थापनाविरोधात आमरण उपोषण आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनावर कंपनी व्यवस्थापनाने निवेदन दिले. त्यात नोंदणीकृत कर्मचारी संघटनेशी आवश्यक चर्चा करून कंपनीने फेब्रुवारी २०२५ मध्ये स्वेच्छानिवृत्ती योजना लागू केली. त्यामध्ये ८८ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. तर २७ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला. त्यानंतर त्यांना कंपनीकडून देण्यात आलेल्या सर्व वैधानिक देयकांसह आणि अतिरिक्त सानुग्रह लाभांसह त्यांचा पूर्ण व अंतिम हिशोब अदा करण्यात आला. स्वेच्छानिवृत्तीनंतर नऊ महिन्यांनी, ४१ माजी कर्मचाऱ्यांनी पुनर्नियुक्तीची मागणी करत कामगार प्राधिकरणांकडे दाद मागितली. पण, स्वेच्छानिवृत्तीवेळी संबंधितांना सर्व देयके दिल्याने व अंतिम निपटारा झाल्यानंतर पुनर्नियुक्ती करणे शक्य नसल्याची भूमिका कंपनीने घेतली आहे. औद्योगिक सौहार्द कायम राखण्याच्या दृष्टीने, बजाज इलेक्ट्रिकल्सने ४१ माजी कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कंत्राटदारामार्फत पर्यायी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यास सहमती दर्शविली आहे. सहाय्यक कामगार आयुक्तांच्या कार्यालयाने संबंधित व्यक्तींना कंत्राटदारामार्फत उपलब्ध करून दिलेल्या व्यवस्थेबाबत कळविले होते. पण, तरीही एकाही व्यक्तीने ही संधी स्वीकारली नसल्याचे स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आले. कर्मचारी मागण्यांवर ठाम बजाज इलेक्ट्रिक्लस्‌ कंपनीत पुनर्स्थापना मिळावी, यासाठी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन सुरु केले आहे. मागील चार दिवसांपासून हे आंदोलन कायम आहे. न्याय मिळेपर्यंत माघार नाही, अशी भूमिका संबंधित कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यात एक नोव्हेंबर रोजी एकता दौड; ४० हजार नागरिक होणार सहभागी

CJP Protest: दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रविवारीही कोर्ट चालूच राहणार! सर्वोच्च न्यायालयात उद्या विशेष सुनावणी

Marathi News Updates : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा

केंद्र सरकारच्या बैठकीत निर्णय न झाल्यास कोगनोळी टोल नाक्यावर बेमुदत बंद, राजू शेट्टींचा सरकारला थेट इशारा

Microfinance : मायक्रोफायनान्स क्षेत्रात सुधारणा; कर्जपुरवठ्यात शिस्त आणि तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका

SCROLL FOR NEXT