bakri eid  esakal
नाशिक

Bakri Eid 2023 : मालेगावला 10 हजार बोकड्यांची विक्री; नमाज पठणानंतर पूर्व भागात कुर्बानी

सकाळ वृत्तसेवा

Bakri Eid 2023 : शहरात बकरी ईद निमित्त रेडा, म्हैस, बोकड आदींची कुर्बानी होणार आहे. बकरी ईदमुळे शुक्रवारच्या (ता.२५) आठवडे बाजारापासून शहरात तब्बल दहा हजार बोकड्यांची विक्री झाली.

यावेळी शंभर किलोचा बोकड एक लाख ४० हजार रुपयांना विक्री झाला. गुरुवारी (ता.२९) ईद-उल-अजहाची (बकरी ईद) नमाज पठण झाल्यानंतर शहरातील पूर्व भागात कुर्बानी होणार आहे. (Bakra eid 2023 Sale of 10 thousand goat to Malegaon nashik news)

शहरात पंधरा दिवसापासून बोकड व्यवसायाला झळाळी आली होती. गेल्या वर्षी जिवंत बोकड ४३० रुपये किलो प्रमाणे विक्रीला गेला. यंदा साडेपाचशे रुपये किलो प्रमाणे जिवंत बोकड बाजारात विक्री होत होता.

येथील बडा कब्रस्तान, तीन कंदील, फरहान हॉस्पिटल, जाफरनगर, सलीम नगर, बजरंगवाडी, आझादनगर अशा डझनभर ठिकाणी बोकड्यांची बाजार भरत होता. नागरिक रात्री उशिरापर्यंत बोकड खरेदी करत होते. बकरी ईदच्या दुसऱ्या दिवसापर्यंत बोकडांची खरेदी-विक्री सुरु राहणार आहे.

सोजत, जमनापारी, गावरान या तीन जातीच्या बोकड्यांची प्रामुख्याने विक्री झाली. बोकड व्यवसायातून येथे सुमारे ६० ते ७० लाखापर्यंत उलाढाल झाली. बोकडमध्ये सोजत (खस्सी) या बोकड्याला नागरिकांनी पसंती दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सोजत बोकड सुंदर, रुबाबदार व वजनाने भरीव असल्याने त्याला मागणी होती. शहरात शंभर ते दीडशे व्यावसायिकांनी विशेषत: मध्यप्रदेश, राजस्थान, खान्देश या भागातून बोकड विक्रीसाठी आणले होते.

खान्देशमधील खाटीक बांधव बोकड कापण्यासाठी दाखल

येथे गुरुवारपासून कुर्बानी होणार आहे. सलग तीन दिवस कुर्बानी होत असल्याने शहरात खाटीक बांधवांच्या घरी त्यांचे पाचोरा, भडगाव, जळगाव, अमळनेर, सावदा, फैजपूर या ठिकाणांहून नातेवाईक बोकड कापण्यासाठी दाखल झाले आहेत.

ईदच्या नमाजनंतर ठिकठिकाणी कुर्बानी होणार आहे. सुमारे दोनशे खाटीक बांधव बोकड कापण्यासाठी आले आहेत. बोकड कापण्यासाठी आठशे ते बाराशे रुपयांपर्यंत दर आकारला जाणार आहे.

"गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा काही प्रमाणात मंदी आहे. बोकड्यांची किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. जास्त विक्री करून नफा कमविला जात आहे." - अब्बास खाटीक, अध्यक्ष, खाटीक समाज, मालेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Asia crisis : महागाई वाढणार! आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीच्या दरात मोठी वाढ, युद्धाच्या झळा सर्वसामान्यांना बसणार, जहाज वाहतुकीचा खर्च वाढला

Ashok Kharat: ५ मिनिटांत भविष्य सांगायचा ‘खेळ’ उघड! भोंदू अशोक खरातची धक्कादायक मोडस ऑप्रेंडी समोर, स्वतंत्र दोन टीमचा वापर

IPL 2026 Marathi News : इम्पॅक्ट प्लेअरच्या विरोधात शुभमन गिल; म्हणतो, क्रिकेट हा ११ जणांचाच खेळ आहे.... ! BCCI वरील दबाव वाढतोय

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर परिते ग्रामस्थांचा सोमवारी न्याय मोर्चा

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स सुमारे 900 अंकांनी खाली; 'या' मोठ्या कंपन्यांचे शेअर्स घसरले

SCROLL FOR NEXT