नाशिक

‘बालगंधर्व’ नूतनीकरणासाठी अडीच कोटी मंजूर

CD
टुडे ३ : ॲंकर NSK26H34623 जळगाव : मराठी रंगभूमी दिनानिमित्त गुरुवारी बालगंधर्व खुले नाट्यगृहात नटराज पूजन करण्यात आले, त्याप्रसंगी उपस्थित आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, महापौर दीपमाला काळे, रंगकर्मी व नाट्यप्रेमी. ------ ‘बालगंधर्व’ नूतनीकरणासाठी अडीच कोटी मंजूर उपशीर्षक रंगकर्मींकडून आधुनिक नाट्यगृहाची मागणी; रंगभूमी दिनी नटराज पूजन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ६ : शहरातील बालगंधर्व खुले नाट्यगृह येथे रंगभूमी दिनानिमित्त रंगभूमीवरील साहित्याचे पूजन, नटराज मूर्तीची पूजा, पारंपरिक नांदी गायन आणि नाटिका सादरीकरण झाले. या वेळी नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी दिली. तर, नूतनीकरणानंतर नाट्यगृहाचे भाडे सर्वसामान्य रंगकर्मींना परवडणारे राहील, असे आश्वासन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिले. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, आमदार सुरेश (राजूमामा), नगरसेवक विष्णू भंगाळे, हर्षल मावळे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सदस्या व नियामक मंडळ सदस्या गीतांजली ठाकरे यांच्यासह ज्येष्ठ रंगकर्मींच्या हस्ते रंगमंच, वाद्ये, नाट्यसंहिता, रंगपेटी आणि नटराज मूर्तीचे पूजन करण्यात आले. या वेळी ‘पंचतुंड नररुंडमालधर...’ या पारंपरिक नांदीचे गायन दुष्यंत जोशी, यश देशपांडे, खुशी बागूल आणि प्रणाली बाविस्कर यांनी केले. त्यांना तबल्यावर दर्शन गुजराथी यांनी साथसंगत केली. उपस्थित मान्यवरांनीही नांदी गायनात सहभाग घेतला. १४-१ रंगकर्मींच्या मागण्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात गीतांजली ठाकरे यांनी रंगभूमीच्या विकासासाठी आवश्यक सुविधांचा मुद्दा उपस्थित केला. जिल्हा नियोजन समितीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी असलेल्या दोन टक्के निधीतून बालगंधर्व खुले नाट्यगृहाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी रंगकर्मींच्या वतीने करण्यात आली. ...यांची होती उपस्थिती या कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सदस्या गीतांजली ठाकरे यांच्यासह चिंतामण पाटील, दुष्यंत जोशी, पीयूष रावळ, दीपक चांदोरकर, नितीन देशमुख,दीपक भट, रमेश भोळे, प्रदीप भोई, महेंद्र खेडकर, सुधीर भटकर यांच्यासह अनेक ज्येष्ठ रंगकर्मी आणि नाट्यप्रेमी उपस्थित होते. रांगोळी सजावटीसाठी कुमुद नारखेडे यांचे सहकार्य लाभले. तुषार वाघुळदे आणि प्रा. राजेंद्र देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. आकाश बाविस्कर यांनी आभार मानले. चौकट ‘गाईड’चे सादरीकरण लेखक व दिग्दर्शक अमोल ठाकूर यांच्या ‘गाईड’ या छोटेखानी नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले. तसेच शरद पांडे यांनी पद्यगायन करून कार्यक्रमात रंगत आणली. रंगभूमीशी नाते जपणाऱ्या ज्येष्ठ आणि नवोदित कलाकारांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला सांस्कृतिक स्वरूप प्राप्त झाले. ------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गाड्यांचे इंजिन धोक्यात! पेट्रोलमध्ये मर्यादेपेक्षा जास्त इथेनॉलची भेसळ; कर्नाटक सरकारचे तेल कंपन्यांवर गंभीर आरोप

SIR Update: मतदार यादीतून नाव वगळलेल्यांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रासह ७ राज्यांतील मतदारांना पुन्हा मिळणार संधी

CET Exam Scam: पैसे घेऊन सीईटीचे गुण वाढवून देण्याचे आश्वासन? कथित ऑडिओ क्लिपमुळे खळबळ; सीईटी कक्षाची पोलिसांत तक्रार

५० हजार लोक, घोड्यावर बसलेली रेखा खाली कोसळली! अख्खा स्टेडियम चिडीचूप, दिग्दर्शकाने ३५ वर्षांनी सांगितला किस्सा

Israel PM Race: नेतन्याहू यांच्याऐवजी आयझेनकोट इस्रायलचे नवे पंतप्रधान बनणार का? अरब पक्षांनी दिला पाठिंबा; पण नेमका पेच काय?

SCROLL FOR NEXT