नाशिक

बाल पारायण सोहळा

CD
धुळे टुडे २ साठी अँकर... --- फोटो-NSK26H32058 धुळे ः बीएपीएस स्वामिनारायण मंदिरात बाल पारायणाअंतर्गत विशेष कार्यक्रमात सहभागी बालक-बालिका. --- स्वामिनारायण मंदिरात ‘बाल पारायण’ सोहळा उत्साहात नृत्य, प्रवचन, नाटिकेतून श्रीमद्‍भागवद्‍गीतेचा संदेश; हजारावर बालकांचा सहभाग सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १२ ः बीएपीएस स्वामिनारायण संस्थेचे अध्यक्ष व आध्यात्मिकप्रमुख परमपूज्य स्वामी महाराज यांच्या प्रेरणेने स्वामिनारायण मंदिरात ११ ऑक्टोबरला ‘बाल पारायण’अंतर्गत श्रीमद्‍भागवद्‍गीतेवर आधारित एक विशेष कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात झाला. या भक्तिमय सोहळ्यात ग्रामीण व शहरी भागातील सुमारे एक हजार ८० बालक व बालिकांनी सहभाग नोंदविला. मंदिराचे कोठारी पूज्य आनंदजीवन स्वामी, पूज्य समर्थपुरुष स्वामी आणि पूज्य निर्दोषवदन स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. यात बालकांनी गीतेचे विचार प्रभावीपणे मांडले. कार्यक्रमात केवळ नाटिकाच नव्हे, तर बालकांनी सादर केलेली भावपूर्ण नृत्ये आणि बाल वक्त्यांची प्रवचने यामुळे वातावरण प्रेरणादायी बनले. श्रीकृष्णाने अर्जुनाच्या मनातील भ्रम दूर करून त्याच्यात युद्ध करण्यासाठी आत्मविश्वास कसा निर्माण केला, याचे जिवंत सादरीकरण विद्यार्थ्यांनी नाटिकेद्वारे केले. प्रामाणिक प्रयत्न आणि सततचा ध्यास यातूनच आत्मविश्वास निर्माण होतो, असा संदेश यातून देण्यात आला. मोबाईल वापरावर भाष्य सध्याच्या डिजिटल युगात तरुण पिढी व विद्यार्थी यूट्यूब, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि इतर सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकत चालले आहेत. यावर भाष्य करताना विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम अधोरेखित केले. मोबाईलचा वापर केवळ अभ्यासापुरता व गरजेपुरताच करावा, असा उपदेश संतांनी उपस्थितांना दिला. आत्मविश्वासाचा संदेश भगवद्‍गीतेतील १८ अध्यायांचा सार सांगताना ‘कर्मयोग’ म्हणजेच कोणत्याही कार्यात आपले १०० टक्के प्रामाणिक प्रयत्न असावेत आणि अंतिम फळासाठी भगवंताला शरण जावे, हा विचार प्रवचन व नाटिकेतून मांडण्यात आला. यासाठी विद्यार्थ्यांनी ‘गजेंद्र मोक्ष’चे प्रसंगबद्ध उदाहरण सादर केले. जेव्हा मगरीने पाय धरल्यावर गजेंद्राचे सर्व प्रयत्न अपुरे पडले, तेव्हा त्याने भगवंताला कमलपुष्प अर्पण करून पूर्ण शरणांगती पत्करली आणि भगवंत त्याच्या रक्षणासाठी धावून आले. मनुष्य जेव्हा परमेश्वराला शरण जातो तेव्हा सर्व भीती नष्ट होऊन आत्मविश्वास दृढ होतो, हा संदेश यातून देण्यात आला. तसेच अभ्यासातील नियमितता आणि वेळेचा सदुपयोग यावरही बाल वक्त्यांनी मार्गदर्शन केले. भाविकांची उपस्थिती सोहळ्याला परिसरातील सुमारे ६०० ते ७०० पुरुष, तसेच ५०० महिला व युवती उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी पूज्य आनंदजीवन स्वामी यांनी उपस्थितांना आशीर्वाद दिले. ‘जय स्वामिनारायण’च्या जयघोषात कार्यक्रमाची सांगता झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईडीने जप्त केलेली 3,464 कोटींची मालमत्ता विक्री करण्यास कोर्टाची मंजुरी; गुंतवणूकदारांचे 1,950 कोटी माघारी मिळणार

Akola Crime : कार लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! ‘एलसीबी’कडून सहा तासांत तीन आरोपी अटकेत, १८.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखान्याच्या विजयी उमेदवारांनी अजितदादांना वाहिली आदरांजली

Cordelia Sky : १,५०० ड्रोनच्या रोषणाईने मुंबईचे आकाश उजळले! ‘कॉर्डेलिया स्काय’चे आगमन

INS Mangrol : मुंबईच्या सागरी सुरक्षेला स्वदेशी ‘आयएनएस मंगरोल’चे बळ!

SCROLL FOR NEXT