नाशिक

येत्या रविवारपासून बालाजी रथोत्सवा

CD
SGR26B07554, SGR26B07553 सोनगीर : रथोत्सवानिमित्त मिरवणुकीसाठी सज्ज असलेले वहन. दुसऱ्या छायाचित्रात बालाजी महाराजांची मूर्ती. --------- सोनगीरला रविवारपासून बालाजी रथोत्सव सोनगीर, ता. ८ : येथे रविवारी (ता. ११) घटस्थापनेपासून श्री. बालाजी रथोत्सवास सुरुवात होत आहे नवरात्र, विजयादशमीला बालाजींची वहन मिरवणूक निघेल. गुरुवारी (ता. २२) भगवान बालाजींची रथयात्रा दुपारी साडेबाराच्या मुहूर्तावर निघेल. यानिमित्त तयारी सुरू झाली आहे. येथील रथोत्सव गावाचे वैभवाचे व चैतन्याचे प्रतिक आहे. येथील बालाजी रथोत्सवाला १७० वर्षांची परंपरा आहे. घटस्थापनेपासून गरगडा नावाच्या एका विशिष्ट वाहनावर बालाजींची मूर्ती व वहनानुसार दररोज वेगवेगळी मूर्ती ठेवून गावातून रात्री मिरवणूक काढली जाते. नवरात्राच्या पहिल्या दिवशी ध्वज वहन, दुसऱ्या दिवशी चंद्रवहन, पुढे सूर्य वहन, हत्ती वहन, नाग वहन, मयूर वहन, अश्व, ऐरावत, मारुती वहन विजयादशमीला गरूड, दुसऱ्या दिवशी पुतळी वहन निघेल. वहन मिरवणुकीचा मान व खर्च गावातील अनुक्रमे अमृतराव कासार व बंधू, बांगडी कासार समाज, गुजराथी कासार समाज, सुभाष फुलदेवरे, गोविंदसिंग परदेशी व उदयसिंग परदेशी, धनगर समाज, चौधरी समाज, सतीष गुजर व शामकांत गुजर, प्रमोद शिंपी, बाळकृष्ण गुजराथी, दीपक गुजराथी, देशमुख समाज यांच्यातर्फे होईल. येथील बालाजी मंदिरापासून वहन मिरवणुकीस सुरूवात होऊन रात्री अकराच्या सुमारास स्वस्थानी पोहचते. दरम्यान, वहन मूर्तीची साफसफाई, रंगरंगोटी करण्यात आली असून, वहन तयार ठेवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patekar Death : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे Cardiac Arrest ने निधन; हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टमध्ये काय फरक असतो? शरीरात नेमकं काय घडतं?

'या' लोकांपासून वेळीच दूर राहा! चाणक्य नीतीत सांगितले आहेत वाईट काळाचे संकेत

Mulund Fire: मुलुंडमध्ये बांधकाम साइटवर मोठा स्फोट, आगीचा भडका, परिसरात धुराचे लोट; Video Viral

Latest Marathi News Live Update: पुण्यात अतिक्रमण निरीक्षकाला लाथ मारून मारहाण

काँग्रेस कार्यकर्त्यांनी मला मारलं, मी मोदी समर्थक; काश्मिरी मुस्लीम तरुणाचा आरोप, दिल्लीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT