नाशिक

शिरपूर : बालाजी वहनोत्सव बातमी

CD
वरचे गावात आजपासून बालाजी मंदिराचा वहनोत्सव शिरपूर, ता. १० : येथील दीडशे वर्षांपेक्षा अधिक परंपरा असलेल्या वरचे गाव श्री व्यंकटेश बालाजी संस्थानच्या वहनोत्सवाला आज (ता. ११) पासून सुरुवात होणार आहे, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष शरदकुमार अग्रवाल यांनी दिली. २१ ऑक्टोबरपर्यंत वहनोत्सव साजरा करण्यात येणार असून, २३ ऑक्टोबरला संस्थानचा मुख्य रथोत्सव साजरा केला जाणार आहे. शिरपूरला दोन रथोत्सवांची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा असून गेल्या दीडशे वर्षापेक्षा अधिक काळ हे उत्सव साजरे केले जात आहेत. वरचे गाव बालाजी संस्थानचा रथोत्सव हा मानाचा समजला जातो. मुख्य रथोत्सवापूर्वी वहनांची मिरवणूक निघते. यंदाच्या वहनोत्सवात रविवारी हत्ती, सोमवारी चंद्र, मंगळवारी मारुती, बुधवारी नाग, गुरुवारी गरुड, शुक्रवारी मोर, शनिवारी वाघ, १८ ऑक्टोबरला सूर्य, १९ ऑक्टोबरला सिंह, २० ऑक्टोबरला हरिण तर २१ ऑक्टोबरला घोडा या वहनांची रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. रथोत्सव आणि वहनोत्सवासाठी संस्थानचे अध्यक्ष शरदकुमार अग्रवाल, कार्याध्यक्ष झेंडूसिंह पाटील, उपाध्यक्ष दिलीप लोहार, उत्तमराव माळी, चिटणीस शामकांत ईशी, सहचिटणीस भूपेश अग्रवाल, कोशाध्यक्ष विशाल माहेश्वरी, सहकोशाध्यक्ष किरण दलाल व विश्वस्त प्रयत्नशील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought: महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट! १९७२ पेक्षाही गंभीर स्थिती; शेतकऱ्यांसाठी गुरुवारी विशेष योजनेची घोषणा हाेणार

Vegetarian Club Sandwich: उकडलेले बटाटे, कुरकुरीत भाज्या अन् आवडीच्या स्प्रेडसह झटपट बनवा चविष्ट व्हेजिटेरियन क्लब सँडविच!

ढिंग टांग : ऑपरेशन ‘स्पेसल २६’..!

Maharashtra Weather : राज्यात थंडीचा जोर ओसरला; दुपारी उन्हाचा चटका वाढला, जाणून घ्या आज तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

आजचे राशिभविष्य - 25 नोव्हेंबर 2026

SCROLL FOR NEXT