Chairman Balasaheb Kshirsagar while starting the auction of grape beads. Neighbor Deputy Chairman Ganesh Domade, Member Bhimraj Kale, Dr. Shrikant Aware and Sonia Holkar  esakal
नाशिक

Nashik Grape Auction: खरेदी-विक्री केंद्रांवरच द्राक्षमणी विक्रीस आणावा : बाळासाहेब क्षीरसागर

खानगाव नजीक व उगाव येथील द्राक्षमणी लिलावाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. श्री. क्षीरसागर यांच्या इतर मान्यवरांनी द्राक्ष मणी क्रेट्‌सचे पूजन केले.

सकाळ वृत्तसेवा

लासलगाव : निफाड तालुक्यात द्राक्ष काढणी हंगाम सुरू झाला असून, द्राक्षांच्या पॅकिंगनंतर उरणाऱ्या मण्यांना योग्य बाजारभाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी द्राक्ष मणी शेतावर विक्री न करता बाजार समितीच्या अधिकृत खरेदी-विक्री केंद्रांवरच विक्रीस आणावेत, असे आवाहन लासलगाव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले. (Balasaheb Kshirsagar Close to Khangaon Ugavala grapes auction started nashik news)

खानगाव नजीक व उगाव येथील द्राक्षमणी लिलावाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. श्री. क्षीरसागर यांच्या इतर मान्यवरांनी द्राक्ष मणी क्रेट्‌सचे पूजन केले.

क्षीरसागर म्हणाले, की खानगाव नजीक व उगाव परिसरातील द्राक्ष उत्पादकांच्या मागणीनुसार बाजार समितीने खानगाव नजीक व उगाव येथे द्राक्षमणी लिलाव सुरू केले आहेत.

गेल्या १९ ते २० वर्षात या केंद्रांना शेतकरी, अडते, व्यापारी व कामगारांनी उत्तम प्रतिसाद दिला असून, शेतकऱ्यांच्या पैशास सुरक्षिततेची हमी मिळाली आहे. बाजार समितीने खरेदी-विक्री केंद्र सुरू करण्यापूर्वी द्राक्षमणी खरेदीदार थेट शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन शिवार खरेदी करीत असे.

स्पर्धा नसल्यामुळे बाजारभावात लूट, तसेच पैशांची हमी नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असे. त्यामुळे बाजार समितीने शेतकरीहित विचारात घेऊन दरवर्षी द्राक्षे हंगामात उगाव, नैताळे, लासलगाव व खानगाव नजीक येथे द्राक्षमणी लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

बाजार समितीचे उपसभापती गणेश डोमाडे, सदस्य भीमराज काळे, डॉ. श्रीकांत आवारे, सोनिया होळकर, नरेंद्र वाढवणे उपस्थित होते. मनोज शेजवळ यांनी सूत्रसंचालन केले.

दरम्यान, खानगाव नजीक केंद्रावर मुहूर्तावर धनंजय मोरे यांच्या मणी ३५ रुपये प्रतिकिलो दराने विक्री झाला. सायंकाळपर्यंत ५७० द्राक्षमणी क्रेट्‌सची आवक झाली. कमीत कमी तीन, जास्तीत जास्त ३५, तर सरासरी साडेअठरा रुपये दर मिळाले.

उगाव केंद्रावर मुहूर्तावर सुदाम क्षीरसागर यांचा द्राक्षमणी २१ रुपये प्रतिकिलो दराने विक्री झाला. सायंकाळपर्यंत १२६ द्राक्षमणी क्रेट्‌सची आवक झाली. कमीत कमी तीन रुपये, जास्तीत जास्त २१, सरासरी १७ रुपये दर मिळाले.

खानगाव नजीक व उगाव येथे दरवर्षी द्राक्षमण्यांच्या खरेदी-विक्रीतून दोन ते अडीच कोटी रुपयांची उलाढाल होते. खानगाव नजीक केंद्रावर २००९ ते २०२३ पर्यंत पाच लाख क्रेट्‌स द्राक्षमण्यांची आवक होऊन सुमारे १६ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.

उगाव केंद्रावर २००४ ते २०२३ पर्यंत १६ लाख क्रेट्‌स द्राक्षमण्यांची आवक होऊन सुमारे ४० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.

द्राक्षमणी खरेदीसाठी अनेक व्यापारी उपस्थित असल्याने उघड व स्पर्धात्मक लिलावाद्वारे द्राक्षेमण्यांना जास्तीत जास्त बाजारभाव मिळतात. त्यामुळे द्राक्षे उत्पादक बांधावर द्राक्षमणी विक्री न करता खरेदी-विक्री केंद्रावर द्राक्षमणी विक्रीस प्राधान्य देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

Pali News : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा सूत्रधार शोधण्यासह इतर मागण्यांचे तहसीलदारांना अंनिसकडून निवेदन

School Blast: शाळेबाहेर स्फोटके! विद्यार्थ्याने फेकताच भीषण स्फोट, महिला आणि विद्यार्थी जखमी

Maharashtra Latest News Update: नाशिकमधील गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग घटवला

SCROLL FOR NEXT