नाशिक

शिवसेनेतर्फे महिलांना साडीवाटप

CD
NSK26H35229 नंदुरबार : बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त महिलांना साड्या वाटप करताना जिल्हाप्रमुख पंडित माळी. शेजारी रिना पाडवी, सागर पाटील, सुनील सोनार, दिनेश सोनवणे, कुणाल पवार, एजाज बागवान आदी. --- बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथीनिमित्त सामाजिक उपक्रम नंदुरबारमध्ये अन्नदान, रक्तदान शिबिरासह कष्टकरी महिलांना साडीवाटप सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १७ : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त नंदुरबार येथे शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रतिमापूजन, अन्नदान, रक्तदान शिबिर, फळवाटप, तसेच गोरगरीब, कामगार महिलांना साडीवाटप करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या वेळी उपस्थित शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. या वेळी अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात आला. रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कष्टकरी कामगार महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. व्यापारी आघाडीतर्फे भाजीपाला मार्केट येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. शेतकऱ्यांना फळवाटप कार्यक्रम झाला. या वेळी जिल्हाप्रमुख पंडित माळी, व्यापारी आघाडीचे प्रमुख बापू महाजन, माजी नगरसेवक विजय माळी व शेतकरी उपस्थित होते. बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर सर्वसामान्य शिवसैनिक आणि जनतेशी नाळ जोडून ठेवली होती. त्यांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी गरजू घटकांना मदतीचा हात देण्यात आल्याचे जिल्हाप्रमुख पंडित माळी यांनी सांगितले. कार्यक्रमाला पक्षाचे जिल्हाप्रमुख पंडित माळी, उपजिल्हाप्रमुख डॉ. हेमंत शर्मा, युवासेना जिल्हाधिकारी सागर पाटील, जिल्हा सचिव दिनेश सोनवणे, महिला आघाडीप्रमुख रिना पाडवी, चारुशिला बागूल, उपजिल्हाप्रमुख सुनील सोनार, तालुकाप्रमुख रमेश पाटील, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बापू महाजन, किसान सेना जिल्हाध्यक्ष बापू राजपूत, अल्पसंख्याक कार्याध्यक्ष मन्नान गणी शिकलीकर, जिल्हाध्यक्ष इम्तियाज पटेल, युवा सेना जिल्हासचिव अक्षय श्रीखंडे, युवासेना उपजिल्हाधिकारी दिनेश भोपे, इम्तियाज खान, शेखर जाधव, एजाज बागवान, रिजवान शेख, भरत गुरव, गोपाळ राजपूत, निंबा पाटील, जाफर शहा, आकाश वळवी, गुड्डू राठोड, अभेसिंग वळवी, खंडू माळी, आनंदा पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या ४८ प्रश्नांच्या अर्जावर सुप्रीम कोर्टात काय घडलं? कपिल सिब्बल यांनी केली 'ही' मागणी

FDA Crime : एम. जी. रस्त्यावरील खाऊ गल्लीत एफडीएची कारवाई; पाच स्टॉल बंद करण्याचे आदेश

Ghodegaon Court : न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू; घोडेगावमध्ये पक्षकारांची गैरसोय, संप मिटवण्याचे वकील संघाचे आवाहन

MS Dhoni Retirement: मै हर एक पल का शायर! धोनीने शेअर केला निवृत्तीनंतर खास Video; म्हणाला, 'चाहत्यांनी मला चुकीचे ठरवले...'

Ladki Bahin Scheme : केवायसी सुरू झाल्याच्या अफवेने महिलांची धावपळ; लाडकी बहीण योजनेबाबत अधिकृत घोषणा नसतानाही केंद्रांवर गर्दी

SCROLL FOR NEXT