मंगळवारच्या अंकासाठी
--
लोगो : महती दीपोत्सवाची- बलिप्रतिपदा
बळीराजाच्या स्मरणासह नव्या वर्षाचा शुभारंभ
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या दिवसाला धार्मिक आणि व्यावसायिक महत्त्व आहे. पहाटे अभ्यंगस्नान करून घरातील देवतांचे पूजन केले जाते. नवीन वस्त्रे परिधान करून मंदिरात दर्शन घेतले जाते. व्यापारी वर्गात नवीन वर्षाच्या व्यवहारांना आणि वहीखात्यांना प्रारंभ करण्याची परंपरा आहे. या दिवसाचा संबंध राजा बळीराजाशी जोडला जातो. भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण करून बळीराजाकडे तीन पावलांचे दान मागितले. दोन पावलांत त्रैलोक्य व्यापल्यानंतर तिसरे पाऊल ठेवण्यासाठी बळीराजाने आपले मस्तक अर्पण केले. त्याच्या दानशूर वृत्तीवर प्रसन्न होऊन विष्णूंनी त्याला पाताळाचे राज्य दिले आणि स्वतः त्याचे द्वारपाल झाले, अशी पौराणिक कथा आहे. या दिवशी गोवर्धन पूजनाचीही परंपरा आहे. गोवर्धन पर्वताचे प्रतीकात्मक पूजन करून श्रीकृष्णाला छप्पन भोगांचा नैवेद्य दाखविला जातो.
-----
भाऊबीज
बहीण-भावाच्या प्रेमबंधाचा सोहळा
कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजे भाऊबीज. दीपावलीच्या उत्सवाची सांगता या सणाने होते. बहीण- भावाच्या प्रेमाचे आणि अतूट नात्याचे प्रतीक म्हणून हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी बहीण भावाला औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्याची आणि सुख-समृद्धीची प्रार्थना करते. भाऊ बहिणीला भेटवस्तू देऊन तिच्याप्रति प्रेम आणि आदर व्यक्त करतो. पौराणिक कथेनुसार, यमधर्माची बहीण यमुना हिने भावाला आपल्या घरी भोजनासाठी आमंत्रित केले. यमाने तिचे आतिथ्य स्वीकारले. त्यामुळे या दिवशी बहिणीकडे जाऊन भोजन करण्याची परंपरा सुरू झाली, असे मानले जाते. यम आणि यमुना यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून या दिवसाला यमद्वितीया असेही म्हणतात.
सख्खी बहीण नसल्यास चुलत, मामे, मावस किंवा मानलेल्या बहिणीकडून औक्षण करून घेण्याची प्रथा आहे. भाऊ दूरदेशी असल्यास चंद्राला भाऊ मानून औक्षण केले जाते. नात्यांमधील प्रेम, जिव्हाळा आणि सन्मान जपण्याचा संदेश भाऊबीज देते.
- लक्ष्मीकांत जोशी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.