YEO26B27479
येवला : बळीराजा गौरव दिनानिमित्त येथून निघालेली बळीराजाची मिरवणूक
------------
येवल्यात सम्राट बळीराजाची शोभायात्रा
------------
बळीराजा गौरव दिनी समताधिष्ठित राज्याचा विचार कृतीत आणण्याचे आवाहन
--------------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.१२ : बळीराजाचा जयघोष, समतेचा विचार आणि परिवर्तनाचा जागर... अशा उत्साही वातावरणात येथे सम्राट बळीराजा गौरव दिन साजरा करण्यात आला. बळीराजाच्या वेशातील सत्यजित चित्ते यांच्या उपस्थितीने शोभायात्रेला विशेष रंगत आली. बळीराजाच्या गौरवाचा जयघोष होत असतानाच दुसरीकडे दुष्काळाच्या झळांनी होरपळणारा शेतकरी, चाऱ्यासाठी भटकणारे पशुधन आणि शासनाच्या घोषणांपुरतीच मर्यादित राहिलेली मदत, या वास्तवाकडे कार्यकर्त्यांनी भाषणांतून लक्ष वेधले.
येथील सत्यशोधक परिवारातर्फे आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी रज्जाक पठाण होते. नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते बळीराजाच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बळीराजाची शोभायात्रा काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषा आणि बळीराजाच्या जयघोषामुळे शोभायात्रेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. दिलीप कुलकर्णी यांनी शासनाच्या दुष्काळ व्यवस्थापनावर टीका केली. महाराष्ट्रातील ३५८ तालुक्यांपैकी ३०५ तालुके शासनाने दुष्काळग्रस्त घोषित केले असतानाही या भागांमध्ये सिंचन, पाणीपुरवठा आणि अन्य पायाभूत सुविधांसाठी अपेक्षित मदत मिळालेली नाही. चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून छावण्यांबाबत प्रत्यक्ष कार्यवाही करण्याऐवजी केवळ घोषणाच केल्या जात आहेत. सामाजिक कार्यकर्ते विक्रम गायकवाड म्हणाले,‘ बलिप्रतिपदा ही बळीराजाच्या स्मृतीची आणि नव्या सामाजिक क्रांतीच्या विचारांची प्रेरणा ठरावी. बळीराजाचे निर्वाण हे नव्या परिवर्तनाचे प्रतीक बनले पाहिजे.
कॉम्रेड भगवान चित्ते, डॉ. दादासाहेब मोरे, किशोर जाधव यांची समयोचित भाषणे झाली. नितीन संसारे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास नानासाहेब शिंदे, मच्छिंद्र आहेर, दिनकर दाणे, आनंद चित्ते, प्रवीण अहिरे, धम्मानंद सोनकांबळे, प्रा. रामप्रसाद वाव्हळ, रोहिणी चित्ते, ऐश्वर्या चित्ते, मंगला खरात, छाया खंडागळे, सुजाता शिंदे, प्रियांका नढे, समीर देशमुख, नितीन साबळे, किरण अहिरे, संदीप पगारे, समाधान पगारे, लक्ष्मण पोळ, अरुण खैरनार, रमेश खैरनार, विलास चित्ते, वाल्मीक लोखंडे, प्रवीण खडांगळे, श्रेया सोनवणे आदी उपस्थित होते.
----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.