fire crackers esakal
नाशिक

नाशिकमध्ये दिवाळीत फटाक्यांवर बंदी; 10 नोव्हेंबरपासून आदेश लागू

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : राज्यातील कोरोनाचं संकट पाहता नाशिकमध्ये फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. येत्या 10 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून हा बंदी आदेश लागू होणार असून कंटेन्मेंट झोन परिसरात फटाके फोडल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. (ban on firecrackers in nashik) नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी हे बंदी आदेश लागू केले आहेत.

10 नोव्हेंबरपासून आदेश लागू

नाशिकमध्ये येत्या 10 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून कुणालाही फटाके फोडता येणार नाही. तसेच कंटेन्मेट झोन परिसरात फटाके फोडण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. फटाके फोडणाऱ्यावर कारवाई करण्याचा इशाराही मांढरे यांनी दिला आहे. विशेष म्हणजे नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार व नगरमधील महापालिका, नगरपालिकांसाठीदेखील ठराव मंजुरीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पुढील महिन्याच्या प्रारंभी दीपोत्सव साजरा होणार असून, त्यासाठी सर्वच पातळीवर तयारी सुरू झाली आहे. नाशिक महापालिकेकडून २१ ऑक्टोबरला फटाका गाळ्यांचे लिलाव काढण्यासाठी जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे.

विभागातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांकडून अशा प्रकारे तयारी सुरू असताना विभागीय आयुक्तांनी शासनाच्या माझी वसुंधरा अभियानाचा संदर्भ देत हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी फटाके बंदीचा ठराव करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिका व नगरपरिषदांमध्ये या बाबींची पुर्तता होईल यासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत. दरम्यान, विभागीय आयुक्तांना एक सप्टेंबरला पत्र प्राप्त झाले असताना १८ ऑक्टोबरला म्हणजे तब्बल दीड महिन्यांनी पत्र नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सुपूर्द करण्यात आल्याने विभागीय आयुक्तांच्या पत्रामुळे या विविध चर्चा होत आहे. तब्बल दीड महिन्यांनी काढलेल्या या पत्रामुळे विभागीय आयुक्तांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात होता.

काय म्हटलंय पत्रात?

माझी वसुंधरा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचे प्रारूप टूलकीटनुसार फटाके बंदीसाठी पुढाकार घेण्यात आला असून, पर्यावरण संवर्धन व हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शंभर गुण देण्यात आले आहेत. दिवाळीत फटाक्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यात शहरी भागात अधिक प्रमाण असल्याने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात फटाक्यांच्या विक्री व वापरावर बंदी घालण्याच्या दृष्टीने ठराव करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT