firecrackers esakal
नाशिक

अखेर फटाकेविक्री बंदी मागे! भुजबळांच्या मध्यस्थीनं सुटला तिढा

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : ऐन दिवाळी जवळ आल्याने बहुतांश ठिकाणी फटाके विक्रेत्यांना परवाने देऊन विक्रीही सुरू झाली. निर्बंध शिथील होत असल्याने दिवाळी (diwali festival) उत्साहात साजरी करण्याकडे नागरिकांचा कल असताना नाशिकच्या विभागीय आयुक्तांच्या फटाकेबंदीच्या पत्रामुळे नवा धमाका झाला होता. मात्र आता उत्तर महाराष्ट्रातील फटाके विक्रेत्यांना (fire crackers sellers) दिलासा मिळाला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीनं हा तिढा अखेर सुटला आहे.

उत्तर महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यात होणार फटाके विक्री

अखेर आता उत्तर महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यात होणार फटाके विक्री होणार आहे. महापालिका महासभेआधीच फटाके विक्री बंदी मागे घेण्यात आली असून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीनं तिढा सुटल्याची माहिती मिळत आहे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी 5 जिल्ह्यांना निर्देश दिले होते. मात्र,भुजबळ यांनी थेट प्रधान सचिव सीताराम कुंटे यांच्या सोबत संवाद साधल्याची माहिती मिळत आहे.

पर्यावरण प्रेमांमध्ये नाराजी

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना बहुतांश निर्बंध खुले झाले आहेत. त्यामुळे सण-उत्सवांवरील निर्बंधही शिथील होत आहेत. अशा परिस्थितीत यावर्षी दिवाळी उत्साहात साजरी होणार, या आशेवर नागरीक आहेत. त्यामुळे जर या पत्राची काटेकोर अंमलबजावणी झाली तर फटाके प्रेमींचीही निराशा होणार होती. मात्र, पर्यावरणवादी नागरिकांकडून याचे स्वागत करण्यात आले होते. दिवाळीत फटक्यांना बंदी घालण्याचा ठराव करून त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. राधाकृष्ण गमे यांनी सर्व महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला दिल्या. त्यामुळे नाशिक विभागात म्हणजेच उत्तर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांपुढे पेच निर्माण झाला होता.

डॉ. गमे यांनी नाशिक विभागातील नाशिक, नगर, जळगाव, धुळे व नंदुबार जिल्ह्यासाठी फटाकेबंदीच्या सूचना दिल्या आहेत. प्रदूषण रोखण्यासाठी नाशिक विभागातील सर्व महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने फटाके विक्री आणि वापर यावर बंदी घालण्याचा ठराव मंजूर करावा. नियमित सभेत हा ठराव होऊ शकला नाही, तर त्यासाठी विशेष सभा बोलाविण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली आहे. २२ ऑक्टोबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करून फटाके बंदीची अधिसूचना काढण्यात यावी, अशा सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. सर्व जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांना डॉ. गमे यांनी हे पत्र पाठविले आहे. दिवाळीत होणारे ध्वनी आणि हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी फटाक्यावर बंदी आणण्याचा ठराव महासभेत करण्यात यावा, त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना जारी कराव्यात, असे पत्रात म्हटले आहे

यंदाच्या दिवाळीत उत्तर महाराष्ट्रात फटाकेबंदीच्या नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. राधाकृष्ण गमेंच्या सूचनेला नगरमधील मनसेनं विरोध केलाय. नगरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसे पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन फटाके फोडून गमेंच्या सूचनेचा निषेध केलाय. फटाकेबंदी म्हणजे हिंदुत्वावर घाला असल्याची प्रतिक्रिया मनसे नगर जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी म्हटलंय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill : टीम इंडियाला धक्का! शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी संघातून बाहेर, 'या' खेळाडूकडे कर्णधारपदाची धुरा...

Rabies Death in Kolhapur : जयसिंगपुरात ५ जणांना चावलं पिसाळलेलं कुत्र, एका महिलेचा रेबीजने मृत्यू; ७ वर्षांच्या मुलीवरही हल्ला

Latest Marathi News Live Update : २००२ च्या तरतुदींनुसार अंदाजे १०८ कोटी रुपये किमतीचा १.३५ एकरचा व्यावसायिक भूखंड तात्पुरता जप्त केला आहे- ईडी

Malegaon Protest : मोठी बातमी ! मालेगाव अत्याचार प्रकरणी जनआक्रोश मोर्चाला हिंसक वळण, आक्रमक आंदोलक गेट तोडून कोर्टात घुसले

Donald Trump: साडेतीनशे टक्के शुल्क लावणार होतो; ट्रम्प यांच्याकडून संघर्ष थांबविल्याचा पुनरुच्चार

SCROLL FOR NEXT