नाशिक

पंचवटीतून दोन बांगलादेशींना गुन्हे शाखा युनिट १ पथकाकडून अटक

CD
बनावट कागदपत्रांवर नाशिकमध्ये बांगलादेशींचा मुक्काम --- पंचवटीत दोघांना अटक; गुजरातमधील एजंटकडून आधारकार्ड, पॅनकार्ड बनविल्याचा संशय सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २ : बांगलादेशातून भारतात अवैधरीत्या घुसखोरी करून पंचवटीतील नवनाथनगर परिसरात वास्तव्यास असलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने शुक्रवारी (ता. २) सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड, बांगलादेशी पासपोर्ट आणि राष्ट्रीय ओळखपत्र जप्त करण्यात आले. देशात प्रवेशासाठी त्यांच्याकडे कोणतेही वैध प्रवासी कागदपत्रे नसल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. दोघेही नाव बदलून नाशिकमध्ये राहत असल्याचे पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी सांगितले. रोनी अब्दुल शेख (वय ३२, सध्या रा. शिंदे चाळ, नवनाथनगर, पंचवटी) याचे मूळ नाव मोहम्मद मुशर्रफ हुसेन मुजीबूर रहमान खोकन, तर आशिक अलीअकबर अन्सारी (वय २४, रा. प्लॉट नं. ८०, नवनाथनगर, पंचवटी) याचे मूळ नाव मोहम्मद सज्जत हुसेन आशिक आहे. दोघेही मिजीबारी, खेजुतल, मुरादपूर, ता. सोमोहनी, जि. नोवाखाली, बांगलादेशमधील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. पंचवटीतील नवनाथनगर परिसरात बांगलादेशी नागरिक अवैधरीत्या राहत असल्याची माहिती हवालदार प्रवीण वाघमारे आणि विशाल देवरे यांना मिळाली. त्यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. वरिष्ठ निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, दत्तात्रय पोटे, रमीज शेख, राम शिंदे, किरण शिरसाठ, सहायक उपनिरीक्षक कैलास चव्हाण, तसेच योगीराज गायकवाड, राजेश लोखंडे, देवीदास ठाकरे, प्रदीप म्हसदे, प्रवीण वाघमारे, रवींद्र आढाव, महेश साळुंके, संदीप भांड, विशाल काठे, विशाल देवरे, मिलिंदसिंग परदेशी, रमेश कोळी, नाझीमखान पठाण, उत्तम पवार, रोहिदास लीलके, मुश्रीफ शेख, गोरक्ष साबळे, धनंजय शिंदे, राहुल पालखेडे, राम बर्डे, अमोल कोष्टी, आप्पा पानवळ, जगेश्वर बोरसे, सुनील भोसले, श्रीकांत सूर्यवंशी, मुक्तार शेख, गणेश रूमाले, शर्मिला कोकणी, मनीषा सरोदे, सुकाम पवार, समाधान पवार, तसेच निवृत्त दत्तात्रय कहनोर यांच्या पथकाने ही कारवाई केली. संशयितांकडील आधारकार्ड व पॅनकार्ड बनावट असल्याचे तपासात निष्पन्न झाले. भारत-बांगलादेश सीमेवरील सक्षम अधिकाऱ्याची लेखी परवानगी किंवा अन्य वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय अवैध मार्गाने भारतात प्रवेश केल्याचेही तपासात समोर आले. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोजगारासाठी नाशिकमध्ये वास्तव्य दोघेही रोजगाराच्या शोधात बांगलादेशातून नाशिकमध्ये आले होते. नवनाथनगर येथे एका खोलीत वास्तव्य करून मिस्तरीचे काम करून ते उपजीविका भागवत होते. शहरात वास्तव्याचे अन्य कोणतेही कारण अद्याप समोर आले नसले, तरी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. गुजरातमधील एजंटाचा शोध दोघे बांगलादेशातून पश्चिम बंगालमार्गे रेल्वेने नाशिकमध्ये आले. त्यापूर्वी गुजरातमध्ये जाऊन एका एजंटच्या माध्यमातून बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड तयार करून घेतल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे बनावट कागदपत्रे तयार करून देणारा एजंट आणि त्याचे अन्य सहकारी यांचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. बांगलादेशी नागरिकत्वाचे पुरावे संशयितांकडून बांगलादेशी पासपोर्ट, पॅनकार्ड आणि राष्ट्रीय ओळखपत्र अशी कागदपत्रे मिळाली. या कागदपत्रांवरून दोघेही बांगलादेशी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले असून, पोलिसांनी ही सर्व कागदपत्रे जप्त केली आहेत. निवृत्त पोलिसाचाही सहभाग गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने केलेल्या या कारवाईत सध्या पोलिस दलात कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांसह निवृत्त पोलिस कर्मचारी दत्तात्रय कहनोर यांचाही सहभाग होता. सेवेतून निवृत्त झाल्यावरही पोलिस कारवाईत सक्रिय सहभाग घेत त्यांनी कर्तव्याची आवड कायम असल्याचे दाखवून दिले. OLN26A14922 नाशिक : ताब्यात घेण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांसह गुन्हे शाखा युनिट एकचे पथक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

IND vs WI, 3rd ODI: अंशुल कंबोजचं भारतासाठी पदार्पण, सिराजलाही संधी; पण दोघांना वगळलं; पाहा Playing XI

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : कराडला तीन एकरातील ऊसाला आग, ऐन दुष्काळात शेतकऱ्याला फटका

SCROLL FOR NEXT