War of colored campaign boards against the backdrop of Gram Panchayat elections. esakal
नाशिक

Nashik News : दाभाडीत रंगलय फलक युद्ध; नैमित्तीक फलकाला शिल्लक नाही जागा!

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या राजकीयदृष्ट्या जागृत दाभाडी ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंचपदासाठी पाच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सहा वॉर्डातील १६ जागांसाठी ५२ उमेदवार नशीब आजमावत आहेत. (banner War in Dabhadi no space left for official banner Nashik News)

सरपंचपदाच्या रिंगणातील गिरणाकाठ फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद निकम यांचे दाभाडी ग्रामविकास पॅनल, माजी पंचायत समिती सभापती शशिकांत निकम यांचे जनसेवा, बाजार समितीचे माजी संचालक संजय निकम यांचे कर्मवीर भाऊसाहेब हिरे असे तीन पॅनल निवडणूक रिंगणात आहेत.

याशिवाय नानाभाई निकम व संयोग निकम हे दोघे उमेदवार आहेत. या निवडणुकीमुळे दाभाडी गाव व परिसर प्रचार फलकांनी व्यापला आहे. प्रचाराचे ७० पेक्षा अधिक प्रचार फलक असून, नैमित्तिक वाढदिवस, पुण्यस्मरण, श्रद्धांजली फलक लावण्यास जागादेखील शिल्लक नाही. फलक युद्ध रंगले असताना अखेरच्या दोन दिवसात आर्थिक उलाढालही जोमाने असेल. मतदार नवनेतृत्व स्विकारणार की प्रस्थापितांना संधी देणार याविषयी उत्सुकता आहे.

दाभाडीतील बाजार तळ, कमान, जवाहर नगर, शिव रस्ता, सी सेक्शन, दौलती स्कुल, इंदिरा नगर, पेठ रस्ता, कारखाना, रोकडोबा नगर, नवी वसाहत, बसस्थानक यासह विविध ठिकाणी फलक झळकले. दाभाडी ग्रामविकास पॅनलचे सोळा उमेदवार व सरपंचपदाचा उमेदवार असे प्रत्येकी एक-एक फलक आहेत. याउलट जनसेवा पॅनल व कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलने सहा वॉर्डातील उमेदवार व सरपंचपदाचा उमेदवार असे स्वतंत्र सहा फलक लावले आहेत. यामुळे फलकांची भाऊगर्दी झाली आहे.

फलकयुद्ध पाहून मतदार राजाबरोबरच बाहेरुन येणारे- जाणारे प्रवासी, नातेवाईकही चक्राऊन गेले आहेत. प्रचारसभा, आरोप- प्रत्यारोपांनी प्रचारात रंगत आणली आहे. तिघा प्रमुख उमेदवारांनी सरपंचपदाची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. सरपंचपदासाठी पालकमंत्री दादा भुसे समर्थक तीन उमेदवार समोरासमोर आहेत. तिघा उमेदवारांच्या प्रचार पत्रकांवर श्री. भुसे यांची छबी आहे. यामुळे तुर्त गाव पातळीवरील निवडणुकीत भुसे यांनी नेमके कोणाच्या पारड्यात आपले वजन टाकले, हे कोडेच आहे.

त्यांचे समर्थक भुसे यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याचे सांगतात. अद्वय हिरे गटाचे संजय निकम हे एकमेव उमेदवार आहेत. शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य संयोग निकम कुठवर मजल मारणार याविषयी उत्सुकता आहे. ग्रामपंचायतीसाठी एकूण १५ हजार ६०३ मतदार आहेत. १८ डिसेंबरला मतदान होणार असून, २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

एक खोक्याची निवडणूक

सरपंचपदासाठी विजयी उमेदवाराला किमान साडेचार हजार मतांचा पल्ला गाठावा लागणार आहे. यातील पाच ते सात हजार मतदारांना उमेदवाराकडून शिधा अपेक्षित आहे. चुरशीची निवडणूक पाहता फुलीचा दर पाचशे रुपये असेल. सरपंचपदासाठीच्या पाचपैकी दोन किंवा तीन उमेदवारांनीही शिधा वाटप केला तरी हा हिशेब खोक्यात जातो.

याशिवाय जेवणावळींचा खर्च वेगळा. आतापर्यंत चौक, गट, तट, मंडळ, संघटना अशा पार्ट्या सुरु होत्या. एकत्रित जेवणावळी दोन दिवसात झडतील. एकूणच दाभाडी ग्रामपंचायत निवडणुकीची चुर्रस दिवसेंदिवस वाढत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT