beating esakal
नाशिक

Nashik Crime News : बिअर दिली नाही म्हणून बारमालकास मारहाण

सकाळ वृत्तसेवा

सिडको (जि. नाशिक) : रात्रीच्या वेळी हॉटेल बंद होत असताना मालकाने बिअर न दिल्याने बार मालकास मारहाण करीत दगड व बिअरच्या बाटलीने गंभीर दुखापत करून बार मालकास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सिडकोतील मैफील बार रेस्टॉरंट या ठिकाणी घडली आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Bar owner beaten up for not serving beer Nashik Crime News)

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

जखमी बार मालक अशोक गोविंदराव कांचेला (५५, रा. हॉलाराम कॉलनी, गंगापूर रोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. रविवारी (ता. 29) रात्री मैफील बार ॲन्ड रेस्टॉरंट बंद करण्याच्या तयारीत असताना प्रशिक अडांगळे व गणेश खांदवे हे बारच्या बाहेर आले. अडांगळे याने बारमालक अशोक कांच्छेला यांच्याजवळ बिअरची मागणी केली.

परंतु, हॉटेल बंद करण्याची वेळ असल्याने त्यांना बिअर न दिल्याने त्याचा राग आला. धमकी देत बार मालकास मारहाण केले. याच वेळी संशयितांनी फोन करून सात ते आठ साथीदारांना बोलावले. साथीदारांनी बार मालकास शिवीगाळ करीत दगडाने व बिअरच्या बाटलीने जबर मारहाण केली.

या वेळी बार मालकाचा मुलगा निखिल यास उजव्या कानावर मारहाण केली. या वेळी अंबड पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी येताच संशयित फरार झाले. संशयित प्रशिक अडांगळे यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अन्य संशयित फरार आहे. घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदन बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलिस करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT