नाशिक

बारीपाड्यात ४० फुटांचा वनराई बंधारा

CD
WRS26B02897 बारीपाडा : साक्री पंचायत समिती व मांजरी ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने उभारलेल्या वनराई बंधाऱ्याजवळ उपस्थित पदाधिकारी व ग्रामस्थ. -------- बारीपाड्यात एकजुटीतून ४० फुटांचा वनराई बंधारा साक्री पंचायत समिती व मांजरी ग्रामपंचायतीचा संयुक्त उपक्रम सकाळ वृत्तसेवा वार्सा, ता. ३१ : बारीपाडा (ता. साक्री) पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा जमिनीत निचरा होण्यास मदत व्हावी, भूजलपातळीत वाढ व्हावी आणि परिसरातील जलसंधारणाला चालना मिळावी, या उद्देशाने साक्री पंचायत समिती व मांजरी ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने बारीपाडा येथील नाल्यावर ४० फूट लांबीचा वनराई बंधारा बांधण्यात आला. या उपक्रमामुळे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला बळ मिळाले आहे. ग्रामीण भागात पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी ते स्थानिक पातळीवर अडवून जमिनीत मुरविणे आवश्यक आहे. त्यासाठी वनराई बंधारे हा कमी खर्चातील प्रभावी पर्याय ठरतो. बारीपाडा येथे उभारण्यात आलेल्या या बंधाऱ्यामुळे नाल्यातील पाणी काही काळ अडवून ठेवण्यास मदत होणार आहे. परिणामी, परिसरातील जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास आणि भूजलपातळी वाढण्यास हातभार लागण्याची अपेक्षा आहे. पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करून भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अशा स्थानिक जलसंधारणाच्या कामांना विशेष महत्त्व आहे. ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यांच्या समन्वयातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागात जलसंधारणाविषयी जनजागृती होण्यासही मदत होणार आहे. या वेळी मांजरीचे सरपंच अनिल पवार, मोहगावचे सरपंच लक्ष्मण महाले, साहेबराव पवार, ग्रामसेवक एफ. डी. कुवर, साक्रीचे गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, विस्तार अधिकारी शशिकांत ठाकरे, रवी ठिंगळे, देवला कुवर, योहान कुवर, सुक्राम बारीस, रावसाहेब अमृतकर आदी उपस्थित होते.

Diwali offer FD: गुंतवणूकदारांना दिवाळी गिफ्ट! 'या' बँकेकडून FD वर मिळणार भरघोस व्याज; ज्येष्ठ नागरिकांना तर ७.२० टक्क्यांपर्यंत परतावा

SHEHBAZ SHARIF: भारताला हरवताच पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा जल्लोष! शहबाज शरीफ यांनी केली अशी पोस्ट सोशल मीडियावर उडाली खिल्ली; नेमकं काय घडलं?

सिंह राशीत गजकेसरी योग; ३ नोव्हेंबरपासून चमकणार 'या' राशींचे नशीब! मिळेल मान-सन्मान, मोठे पद अन् पैसा...

Marathi News Live Updates : नागपुरात पदवीधर मतदार नोंदणीतील अपयशावरून भाजपमध्ये अंतर्गत कलह; नेते ओमप्रकाश यादव यांचा पक्षातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

Karnataka Rajyotsava : बेळगावात उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांना प्रवेशबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश जारी, कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त!

SCROLL FOR NEXT