police barricades esakal
नाशिक

Nashik : बॅरिकेटस ठरताय चालकांसाठी डोकेदुखी

केशव मते

मखमलाबाद (जि. नाशिक) : नाकाबंदी, वाहन तपासणीसाठी शहरातील रस्त्यांवर बॅरिकेटस (Barricades) टाकून वाहनांची तपासणी केली जाते. भरधाव वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठीदेखील विविध ठिकाणी बॅरिकेटस टाकल्या जातात. मात्र, पेठ रोडवर या बॅरिकेटमुळे आठवडाभरात तीन अपघात (Accident) झाल्याने असे बॅरिकेटस सुविधेएवजी वाहनचालकांसाठी दुविधाजनक ठरत आहेत. यामुळे पोलिसांची तपासणी सुरू नसताना बॅरिकेटस रस्त्याच्या कडेला ठेवत अपघात टाळावेत, अशी मागणी परिसरातील रहिवासी व वाहनचालकांकडून होते आहे.

गुजरातला जाणाऱ्या वाहनांची पेठ रोडवर नेहमीच वर्दळ असते. रात्री मालवाहू वाहनेही भरधाव वेगाने जात असतात. मात्र, येथे रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या बॅरिकेटसमधून मार्ग काढताना वाहनचालकांचे नियंत्रण सुटून वाहन अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावर लाइटही नसल्याने अंधारात येथे अपघात होत आहेत. पोलिसांनी केलेले बॅरिकेटस कारवाई नसतांनाही येथे रस्त्यावर तसेच पडून राहतात. बॅरिकेटला कुठलेही रिफ्लेक्टर नसल्याने भरधाव जाणाऱ्या वाहनाच्या चालकांना अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत. यामुळे बॅरिकेटस वाहनचालकांसाठी दुविधाजनक ठरत आहेत. यामुळे रस्त्यावरील बॅरिकेटस काढावे व स्ट्रीट लाइट सुरू करावे, अशी मागणी विजय पिंगळे, योगेश पिंगळे, पंकज पिंगळे, सुमीत थेटे, विक्रम पिंगळे, धीरज शिंदे, किरण पिंगळे, किशोर रसाळ व जय हनुमान कला व क्रीडा सांस्कृतिक विकास मंडळाने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

थकलेला चेहरा, चालताही येईना... नवऱ्याला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी यांना अश्रू अनावर; या कलाकारांचीही हजेरी

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Latest Marathi News Live Update : नवी मुंबई खारघर रेल्वे स्थानकावर ओव्हरहेड वायरमध्ये शॉर्टसर्किट; रेल्वे वाहतूक ठप्प

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

SCROLL FOR NEXT