human body.jpg 
नाशिक

सावध व्हा...'हा' आजार पडेल महागात...कोरोनाचे व्हाल बळी!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : इतिहासातील अन्य महामारीपेक्षा कोविड-19 संसर्गात मृत्यूचे प्रमाण कमी आहे, हे खरे. परंतु, जे चार-पाच टक्‍के रुग्ण या रोगाला बळी पडताहेत, त्यात कोणती कारणे प्रमुख आहेत, याचा शोध घेतला असता समोर आलेली माहिती अन्य रुग्णांना सावध करणारी आहे. 

फुफ्फुसाचा आजार असलेले सर्वाधिक रुग्ण

नाशिक शहरात मरण पावलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये फुफ्फुसाचा आजार असलेले सर्वाधिक आहेत, तर एकूण जिल्ह्याचा विचार करता मधुमेह, अतितणाव किंवा कोरोनाची भीती, श्‍वसनाच्या अन्य आजाराची पार्श्‍वभूमी ठळकपणे समोर आली आहे. याच पद्धतीने मृतांच्या वयाचे पृथक्‍करण केले असता स्पष्ट झाले आहे, की सर्वाधिक 50 टक्‍के मृत्यू चाळिशी ते साठीच्या वयोगटातील आहेत, तर त्याखालोखाल मृतांची संख्या साठी ओलांडलेल्यांची आहे. जगभर वयाची साठ वर्षे ओलांडलेल्या ज्येष्ठांना कोविड-19 चा सर्वाधिक धोका असल्याचे सांगितले जाते. नाशिक जिल्ह्यात हे जोखमीचे वय त्यापेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे. ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा धोका तुलनेने जास्त असला तरी त्यातही ज्यांना फुफ्फुसाचे आजार आहेत, त्यांच्यासाठी हा आजार जीवघेणा ठरला आहे. 

शहरात 68 कोरोनाबाधितांचा मृत्यू

नाशिक शहरात आतापर्यंत 68 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, सोमवार (ता. 22 जून)अखेर जिल्ह्याच्या अन्य भागातील 107 मिळून एकूण 185 जणांचा बळी गेला आहे. शहरातील मृतांमध्ये फुफ्फुसाचा आजार असलेल्या 28 रुग्णांचा (41 टक्के) समावेश आहे, तर मरण पावलेल्या दहा जणांना हृदयाचा विकार होता. अतितणावाचा (हायपरटेन्शन) सहा जणांच्या मृत्यूशी संबंध आहे. मृतांमध्ये एक गर्भवती व मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त एकाचा समावेश आहे. उर्वरित 15 मृतांना अशी कोणतीही विशेष पार्श्‍वभूमी नव्हती. 

जिल्ह्यातील कोरोना मृतांची स्थिती (22 जूनअखेरपर्यंत) 
वयोमानानुसार कोरोना मृत्यू 
वयोगट कोरोनाबाधित कोरोना मृत्यू (पुरुष-महिला) एकूण

0 ते 12 260 0-0 0 
13 ते 25 500 3-4 7 
26 ते 40 936 10-7 17 
41 ते 60 801 58-31 89 
60 वर्षांवरील 317 43-19 62 
एकूण : 2,814 114-61 175 

जिल्ह्यातील मृतांची वैद्यकीय पार्श्‍वभूमी 

मधुमेह : 50 
अतितणाव : 28 
श्‍वसनाचा त्रास : 22 
विशेष आजार नसलेले : 34 
अन्य किरकोळ आजार : 41 
एकूण : 175 

मृत्यूपूर्वीचा उपचाराचा कालावधी
 
- उपचारापूर्वीच : 8 
- पहिल्या दिवशी : 77 
- दुसऱ्या दिवशी : 42 
- तिसऱ्या दिवशी : 24 
- चौथ्या व त्यानंतर : 24 
एकूण : 175 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT