bolthan doctor.jpg
bolthan doctor.jpg 
नाशिक

"डॉक्टर..तुम्ही माझ्या बाळावर व्यवस्थित उपचार केले नाही"...कुरापत काढून चक्क बालरोगतज्ज्ञाला मारहाण 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / नांदगाव : बाळावर व्यवस्थित उपचार केला नसल्याचा राग आल्याने तालुक्‍यातील बोलठाण येथील बालरोगतज्ज्ञाला एकाने मारहाण केली. घटनेचा निषेध म्हणून तालुक्‍यातील डॉक्‍टर्स असोसिएशनने अत्यावश्‍यक सेवा वगळता बंद पळून निषेध व्यक्त केला. 

याबाबत माहिती अशी की... 

बोलठाण येथील डॉ. देवेंद्र आहेर यांच्याकडे विजय पवार यांनी त्यांच्या लहान मुलाला वैद्यकीय उपचारासाठी नेले. मात्र तुम्ही माझ्या बाळावर व्यवस्थित उपचार केले नाही, अशी कुरापत काढून शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. घटना कळताच तालुक्‍यातील डॉक्‍टर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत दोषींवर कारवाई करावी, यासाठी निवेदन दिले. डॉ. शांतीलाल पारख, डॉ. गादिया, डॉ. सुनील तुसे, डॉ. दुकळे, डॉ. नावंदर, डॉ. भरत जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. घटनेचा निषेध म्हणून डॉक्‍टरांनी आपली वैद्यकीय सेवा काही काळ बंद ठेवली. दरम्यान, पोलिसांनी डॉ. देवेंद्र आहेर यांना मारहाण करणाऱ्या विजय पवार यांच्याविरोधात महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

असोसिएशनतर्फे घटनेच्या निषेधार्थ निवेदन 
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी (ता. 18) शहरातील मेडिकल्स ड्रग्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रभारी तहसीलदार योगेश जमदाडे व पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना निवेदन दिले. डॉ. आहेर यांच्यावर क्षुल्लक कारणावरून रुग्णाच्या नातेवाईकाने हल्ला केला. या प्राणघातक हल्ल्याचा तीव्र निषेध करत समाजातील अशा विकृत मानसिकतेला कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त केली. केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष महेश सोनवणे-पाटील, महावीर सुराणा, शरद आहेर, सागर गोयेकर, सतीश जाधव, संजय लोहाडे, सुनील दुग्गड, आशुतोष गुंजाल, चंद्रशेखर चव्हाण, गणेश शिंदे, नीरज सुराणा, विक्की गायकवाड, पोपट खैरे, शेख सबीक दस्तगीर आदी उपस्थित होते. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Elections 2024: नगरमध्ये PM मोदींनी लालूंवर सोडले टीकास्त्र! मुस्लिम आरक्षणावरून सुरू झाला वाद, काय म्हणाले?

Ajit Pawar : दत्ता भरणेंचा शिवीगाळ केल्याच्या व्हिडिओ व्हायरल; अजितदादा म्हणतात, हस्तक्षेप केला कारण...

Gold Investment: सोन्याचे भाव भिडले गगनाला.. यंदाच्या अक्षय तृतीयेला सोने खरेदी करावी का? तज्ज्ञ काय सांगतात

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : रायगडमध्ये मतदारांनी मतदानानंतर केलं रक्तदान..

SCROLL FOR NEXT