खंडणीसाठी धमकी;
दोघांविरुद्ध गुन्हा
सातपूर : श्रमिकनगर येथे बिअर शॉपी चालकाकडे खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाला असून, याप्रकरणी पोलिसांनी संशयित कौशल गोरे आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. आम्ही भाई आहोत. प्रत्येक वेळी आम्हाला फुकट बिअर द्यावी लागेल. येथे व्यवसाय करायचा असेल तर दर महिन्याला पाच हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, असा दम संशयितांनी भरल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यावर चालक अनिकेत मिश्रा यांनी असे करता येणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर संशयितांनी शिवीगाळ करत मारहाण करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
-----------
व्यावसायिकास
टवाळखोरांकडून मारहाण
सातपूर : . अशोकनगरच्या मुख्य रस्त्यावरील अशोका इमारतीबाहेर टवाळखोरांनी मंडप व डीजे व्यावसायिक संदीप मधुकर भंदुरे यांना बेदम मारहाण केली. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. डोक्यात सिलिंडर मारल्याने ते गंभीर जखमी झाल्याची माहिती असून, त्यांना पुढील उपचारासाठी शहरातील एका मोठ्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे सातपूर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित टवाळखोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच अशोकनगर परिसरात नियमित आणि प्रभावी पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.