मराठीच्या पेपरने उद्यापासून दहावीच्‍या परीक्षेला सुरवात
मराठीच्या पेपरने उद्यापासून दहावीच्‍या परीक्षेला सुरवात 
नाशिक

मराठीच्या पेपरने उद्यापासून दहावीच्‍या परीक्षेला सुरवात

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : इयत्ता बारावी पाठोपाठ दहावीच्‍या लेखी परीक्षेला मंगळवार (ता. १५)पासून सुरवात होत आहे. सकाळी साडेदहा ते दुपारी दोन या वेळेत मराठी, हिंदी, ऊर्दूसह अन्‍य प्रथम भाषा विषयाचा पेपर होईल. तर दुपारच्या सत्रात तीन ते साडेसहा या वेळेत जर्मन, फ्रेंच भाषेचा पेपर होणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील ९३ हजार ७०८ विद्यार्थ्यांसह संपूर्ण विभागातून तब्बल दोन लाख एक हजार १९९ विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत. येत्या ४ एप्रिलपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव निवळला असला, तरी परीक्षा ऑनलाइन घ्यावी, अशी काही विद्यार्थी-पालकांची मागणी होती. परंतु, राज्‍य शासन व शिक्षण विभाग ऑनलाइन परीक्षेवर ठाम होते. दरम्‍यान, परीक्षा केंद्रांवर गर्दी टाळण्यासाठी शाळा तेथे परीक्षा केंद्र हे धोरण जाहीर केलेले आहे. त्यामुळे या वर्षी परीक्षा केंद्रांची संख्या वाढलेली आहे.

जिल्हानिहाय केंद्र व विद्यार्थी

  • जिल्‍हा - नियमित परीक्षा केंद्र - शाळा तेथे परीक्षा केंद्र - विद्यार्थिसंख्या

  • नाशिक - २०३ - १,०७७ - ९३,७०८

  • जळगाव - १३८ - ७६१ - ५८,५१०

  • धुळे - ६६ - ४५१ - २८,६०३

  • नंदुरबार - ४८ - ३७७ - २०,६७८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

SCROLL FOR NEXT