नाशिक

‘बेस्ट कॅम्पस डायरेक्टर’ने डॉ. सी. के. पाटील सन्मानित

CD
फोटो -NSK26H32693 नाशिक : ‘स्टार एज्युकेशन ॲवॉर्ड्‌स २०२६’ या पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार स्वीकारताना डॉ. सी. के. पाटील, विजय सोनवणे व ऋषिकेश बरकले. ‘बेस्ट कॅम्पस डायरेक्टर’ने डॉ. सी. के. पाटील सन्मानित सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १६ : शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय नेतृत्व, शिस्तबद्ध कार्यपद्धती, ध्येयकेंद्रित दृष्टिकोन, कठोर परिश्रम आणि संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेत शताब्दी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. सी. के. पाटील यांना प्रतिष्ठेचा ‘बेस्ट कॅम्पस डायरेक्टर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. एज्युकेशन सप्लाय अँड फ्रँचायझी एक्स्पो आणि द टाइम्स ऑफ इंडिया यांच्या सहयोगाने आयोजित ‘स्टार एज्युकेशन ॲवॉर्ड्‌स २०२६’ या पुरस्कार सोहळ्यात त्यांना गौरविण्यात आले. तसेच डिप्लोमा विभागासाठी उत्कृष्ट महाविद्यालयाचा आणि आयटीआयसाठी उत्कृष्ट संस्थेचा पुरस्कार संबंधित प्राचार्यांना प्रदान करण्यात आला. विजय सोनवणे यांना डिप्लोमा महाविद्यालयासाठी, तर ऋषिकेश बरकले यांना आयटीआय संस्थेसाठी हा सन्मान मिळाला. या तिहेरी यशामुळे शताब्दी समूहाच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि संस्थात्मक विकासाच्या प्रयत्नांना विशेष अधोरेखित करण्यात आले आहे. या यशामागे संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त आणि विश्वस्तांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे. ललिता वीर, दत्तात्रय वीर, डॉ. प्रीतम वीर आणि डॉ. स्नेहा वीर यांनी दिलेला विश्वास, प्रोत्साहन आणि पाठबळ याबद्दल डॉ. पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच प्राचार्य डॉ संजय बागुल, सर्व विभागप्रमुख, कॅम्पस टीपीओ, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सामूहिक योगदानामुळेच हा सन्मान शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.

IND W VS ZIM W: संकटमोचक बनून आली दीप्ती शर्मा! झिम्बाब्वेविरुद्ध २७ धावांत ४ विकेट्स गमावल्यानंतरही भारताचा थरारक विजय

Bombay High Court Decision : महाराष्ट्रात दिवाळीत फटाके फोडण्यावर निर्बंध; मुंबई उच्च न्यायालयाचा अत्यंत मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय!

Delhi Protest High Voltage : "ज्ञानेश कुमारांना भारतरत्न द्या!"; सीजेपीच्या 'तिरंगा यात्रे'दरम्यान अभिजीत दिपकेंविरोधात घोषणाबाजी, 'मोदी-मोदी'च्या नाऱ्यांनी दणाणला परिसर

Albatya Galbatya 2.0 Drama : ‘अलबत्या गलबत्या’ने रचला इतिहास; सलग सात प्रयोगांचा ‘शिखर विश्वविक्रम’

Badnapur Drought : ‘पाच हजारांत दिवाळी कशी साजरी करायची? दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा आर्त सवाल; रामदास आठवले यांच्यासमोर शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

SCROLL FOR NEXT